ETV Bharat / state

अखेर उद्धव ठाकरेंनी दुष्काळग्रस्त शेतकरी दाम्पत्याला दिलेला 'तो' शब्द पाळला

सांगलीच्या जत तालुक्यातील संजय सावंत आणि त्यांची पत्नी रुपाली सावंत हे वारकरी दाम्पत्य शेतकरी आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून, ५ दिवस निरंकार उपवास करत 85 किलोमीटर अनवाणी पायाने विठ्ठल दर्शनाला हे दोघे पंढरपूरला गेले होते.

uddhav thackeray
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Nov 28, 2019, 12:42 PM IST

Updated : Nov 28, 2019, 2:09 PM IST

सांगली - शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, यासाठी विठ्ठलाचरणी साकडे घालत, शपथविधी सोहळ्याला बोलवण्याची व्यक्त केलेली शेतकरी दाम्पत्याची इच्छा अखेर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण केली आहे. सांगलीच्या जतमधील शेतकरी दाम्पत्याला ठाकरे यांनी मुंबईला शपथविधी सोहळ्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यानुसार हे दाम्पत्य मुंबईला रवाना झाले आहे.

अखेर उद्धव ठाकरेंनी दुष्काळग्रस्त शेतकरी दाम्पत्याला दिलेला शब्द पाळला

हेही वाचा - महाराष्ट्राला दुसऱ्यांदा मिळणार मुंबईचा मुख्यमंत्री; मात्र, दोन्ही शिवसेनेचेच

सांगलीच्या जत तालुक्यातील संजय सावंत आणि त्यांची पत्नी रुपाली सावंत हे वारकरी दाम्पत्य शेतकरी आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून, ५ दिवस निरंकार उपवास करत 85 किलोमीटर अनवाणी पायाने विठ्ठल दर्शनाला हे दोघे पंढरपूरला गेले होते. यादरम्यान, उद्धव ठाकरे 15 नोव्हेंबरला सांगलीमधील खानापूर, कडेगावमधील पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कडेगाव तालुक्यात सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून पंढरपूरमधून आणलेली तुळशीची माळ आणि चंद्रभागेमधील तीर्थ भेट दिले होते. यावेळी संजय सावंत यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना मला मंचासमोर जवळ उभं करा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

त्यावर उद्धव ठाकरे यांनी लगेच तुमचा संपर्क क्रमांक द्या, मी तुम्हाला शपथविधी सोहळ्यात स्टेजजवळ का मंचावर उभं करतो, असे आश्वासन दिले होते. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्याने आज पार पडणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी सावंत दाम्पत्याला मतोश्रीवरून निमंत्रण आले आहे. त्यानुसार सावंत मुंबईच्या दिशेने लगेच रवाना देखील झाले आहेत.

uddhav thackeray
उद्धव ठाकरेंनी दुष्काळग्रस्त शेतकरी दांपत्याला दिलेला शब्द पाळला

हेही वाचा - संध्याकाळी उद्धव ठाकरे घेणार महाविकासआघाडीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

नुकसान पाहणी दौऱ्यात अचानक समोर आलेल्या सावंत यांनी व्यक्त केलेली इच्छा व उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाची आठवण ठेवत सावंत यांना शपथविधी सोहळ्याला बोलवून आपला शब्द पाळला आहे.

Intro:

File. Name - mh_sng_01_shetkari_shapathvidhi_nimantran_vis_01_7203751 - to - mh_sng_01_shetkari_shapathvidhi_nimantran_img_03_7203751

स्लग - अखेर उद्धव ठाकरेंनी दुष्काळग्रस्त शेतकरी दांपत्याला दिलेला शब्द पाळला..

अँकर - शिवसेनाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी विठ्ठल चरणी साकडे घालत उद्धव ठाकरेंकडे शपथविधी सोहळ्याला बोलवण्याची व्यक्त केलेली दुष्काळग्रस्त शेतकरी दांपत्याची इच्छा, अखेर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण केली आहे.सांगलीच्या जत मधील शेतकरी दांपत्याला ठाकरे यांनी मुंबईला शपथविधी सोहळयासाठी बोलवून घेतले आहे.
Body:सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संजय सावंत आणि त्यांची पत्नी रुपाली सावंत हे वारकरी शेतकरी दांपत्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून,पाच दिवस निरंकार उपवास करत 85 किलोमीटर अनवाणी पायाने विठ्ठल दर्शनाला पंढरपूरला गेले होते. यादरम्यान उद्धव ठाकरे 15 नोव्हेंबरला सांगली मधील खानापूर,कडेगाव मधील पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी दौऱ्यावर आले असताना,त्यावेळी कडेगाव तालुक्यात सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून पंढरपूरमधून आणलेली तुळशीची माळ आणि चंद्रभागेमधील तीर्थ भेट दिले होते.यावेळी संजय सावंत यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना मला स्टेजसमोर जवळ उभं करा अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी लगेच तुमचा संपर्क क्रमांक द्या, मी तुम्हाला शपथविधी सोहळ्यात स्टेजजवळ का स्टेजवर उभं करतो,असं आश्वासन दिले होते. आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्याने आज पार पडणाऱ्या , शपथविधी सोहळ्यासाठी सावंत दांपत्याला मतोश्रीवरून निमंत्रण आले . त्यानुसार सावंत मुंबईच्या दिशेने लगेच रवाना देखील झाले.नुकसान पाहणी दौऱ्यात अचानक समोर आलेल्या सावंत यांनी व्यक्त केलेली इच्छा व उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाची आठवण ठेवत
सावंत यांना शपथविधी सोहळ्याला बोलवून आपला शब्द पाळला आहे.

Conclusion:
Last Updated : Nov 28, 2019, 2:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.