ETV Bharat / state

Sangli News: पोहण्याकरिता तिघांनी कॅनॉलमध्ये घेतली उडी; दोघे गेले वाहून, तिसऱ्याला वाचविण्यात आले यश - Two Young Boys Drowned In Canal Miraj

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातल्या बेडगमधील म्हैसाळ कॅनलमध्ये बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर यामध्ये वाहून जाणाऱ्या तिसऱ्या तरुणाला वाचण्यात यश आले आहे.

Sangli News
कॅनॉलमध्ये दोघे गेले वाहून
author img

By

Published : Apr 5, 2023, 9:38 AM IST

तिघांनी कॅनॉलमध्ये घेतली उडी; दोघे गेले वाहून

सांगली : मिरज तालुक्यातल्या बेडग येथे म्हैसाळ कॅनॉलमध्ये बुडून दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर यामध्ये वाहून जाणाऱ्या तिसरया तरुणाला वाचण्यात यश आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुण सांगलीच्या माधवनगर येथील आहेत. पोहण्यासाठी कॅनॉलमध्ये उतरल्यानंतर घडली आहे. तर वाहून गेलेल्या तरुणांच्या मृतदेहाचा शोध उशिरापर्यंत सुरू होता.



कालव्यात पोहण्यासाठी उतरले: मिरज तालुक्यातील बेडग येथे दोन तरुण म्हैसाळ कालव्यात वाहून गेल्याने बुडाले आहेत. तर वाहून जाणाऱ्या एका तरुणाला वाचवण्यात यश आले आहे. सलमान तांबोळी (21 ), आरमान हुसेन मुलाणी (16 ) असे मृत तरुणांची नावे आहेत. तर नदीम फिरोज मुलाणी असे वाचलेल्या तरुणाचे नाव आहे. बेडगच्या म्हैसाळ मुख्य कालव्यात पोहण्यासाठी उतरले असता ही घटना घडली आहे. हे तिघेही माधवनगर येथील असून सदर तरुणापैकी सलमान टेम्पो चालक असल्याने भाडे घेऊन तो बेडग येथे आले होते. यावेळी त्याच्या सोबत आरमान मुलाणी व नदीम मुलाणी हे दोघे ही आले होते.

पोहण्याचा मोह आवरला नाही: सध्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने बेडग येथील मुख्य कालवा प्रवाहीत आहे. पाणी पाहून पाण्यात उतरून पोहण्याचा मोह तिघांना आवरला नाही. तिघेही या प्रवाहीत पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने तिघेही वाहू लागले. त्यांचा आरडाओरडा सुरू झाल्यावर आसपासच्या असणाऱ्या ग्रामस्थांनी धाव घेऊन वाहून जाणारया नदीम मुलाणीला वाचवले. मात्र, सलमान तांबोळी आणि आरमान मुलाणी हे दोघे वाहून गेली. या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर आयुष्य हेल्पलाइन टीमकडून वाहून गेलेल्या दोघा तरुणांचा शोध सुरू आहे. उशिरापर्यंत या दोघांच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ होत व्यक्त आहे.

हेही वाचा: Sangli Fish Death Case कृष्णा नदीतील मासे मृत्यूप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्वप्नपूर्ती डिस्टलरीवर बंदीची कारवाई

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.