ETV Bharat / state

सराईत दुचाकी चोराला अटक, 8 दुचाकी जप्त - Sangli Latest News

एका सराईत दुचाकी चोरट्यास सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रशांत कदम असे या चोरट्याचे नाव असून, त्याच्याकडून आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तो कुपवाड एमआयडीसी परिसरामध्ये चोरी केलेली दुचाकी विक्रीसाठी घेऊन आला होता, यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

सराईत दुचाकी चोराला अटक, 8 दुचाकी जप्त
सराईत दुचाकी चोराला अटक, 8 दुचाकी जप्त
author img

By

Published : Feb 3, 2021, 7:12 PM IST

सांगली - एका सराईत दुचाकी चोरट्यास सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रशांत कदम असे या चोरट्याचे नाव असून, त्याच्याकडून आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तो कुपवाड एमआयडीसी परिसरामध्ये चोरी केलेली दुचाकी विक्रीसाठी घेऊन आला होता, यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

आरोपीकडून 8 दुचाकी हस्तगत

आरोपी प्रशांत कदम हा चोरीची दुचाकी विकण्यासाठी कुपवाडा एमआयडीसी परिसरामध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याने सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातून दुचाकींची चोरी केल्याचे तपासातून समोर आले आहे. तसेच या चोरीत त्याचे 3 साथीदारही सहभागी असून, यापूर्वी 14 दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली असल्याची कबुलीही यावेळी त्याने दिली. दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून सव्वाचार लाखांच्या 8 दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच त्याच्याकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.