सांगली - किड्यांच्या थव्यामुळे सांगलीच्या आयर्विन पुलावर एक अपघात झाल्याच्या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हा अपघात नेमका कधी झाला, हे कळू शकले नाही, मात्र एका दुचाकीस्वाराच्या मोबाईलमध्ये अपघात कैद झाला. हा अपघात काळजाचा ठोका चुकवणारा आहे.
किड्यांच्या थव्यात काळजाचा ठोका चुकवणार अपघात कॅमेरात कैद..! - आयर्विन पुलावर किड्यांमुळे अपघात
पावसाळ्यात किंवा पावसाच्या दरम्यान उडणाऱ्या मुंगी-किड्यांचे थवे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. प्रामुख्याने विद्युत प्रकाशाच्या भोवती या किड्यांचे थवे मोठ्या प्रमाणात घुटमळतात. अशा उडणाऱ्या छोट्या किड्यांमुळे अपघात झाला.
![किड्यांच्या थव्यात काळजाचा ठोका चुकवणार अपघात कॅमेरात कैद..! सांगली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9694483-832-9694483-1606557739020.jpg?imwidth=3840)
सांगली
सांगली - किड्यांच्या थव्यामुळे सांगलीच्या आयर्विन पुलावर एक अपघात झाल्याच्या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हा अपघात नेमका कधी झाला, हे कळू शकले नाही, मात्र एका दुचाकीस्वाराच्या मोबाईलमध्ये अपघात कैद झाला. हा अपघात काळजाचा ठोका चुकवणारा आहे.
अपघात कॅमेरात कैद
पावसाळ्यात किंवा पावसाच्या दरम्यान उडणाऱ्या मुंगी-किड्यांचे थवे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. प्रामुख्याने विद्युत प्रकाशाच्या भोवती या किड्यांचे थवे मोठ्या प्रमाणात घुटमळतात. अश्याच किड्यांचे थवे सांगलीच्या आयर्विन पुलावरही विद्युत प्रकाशाच्या सभोवती निर्माण झाले होते. त्यामुळे याठिकाणी पुलावरील रस्त्यावर किड्यांचे साम्राज्य पसरले होते.
काळजाचा ठोका चुकवणार अपघात!
या पुलावर जाताना एका दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये हे सर्व चित्रिकरण सुरू केले असता, त्याठिकाणी त्या दुचाकीस्वाराच्या शेजारून जाणाऱ्या दुचाकी आणि समोरून आलेल्या दुचाकीची जोरदार धडक झाल्याची घटना कैद झाली आहे. यामध्ये दुचाकीस्वार हा उडून दुचाकीच्या समोर पडल्याचे दृश्य कैद झाले आहे. किड्यांच्या थव्यामुळे समोरचे काही नीट दिसत नसल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.
किड्यांचे थवे, अपघात व्हायरल
पुलावरील किड्यांचे थवे आणि या दरम्यान घडलेल्या दुचाकीच्या अपघाताचा व्हिडिओ सध्या सांगलीत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, ही घटना नेमकी कधी घडली आहे, हे समजू शकले नाही. पण, या घटनेचा व्हिडिओ पाहून अनेक जणांच्या काळजाचा ठोका चुकत आहे.

Last Updated : Nov 28, 2020, 4:20 PM IST