ETV Bharat / state

सांगलीत पत्नीला पळवल्याच्या रागातून तरुणाची हत्या; २ संशयितांना अटक

शहरातील गोकुळनगरातील तात्यासाहेब मळा येथे एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. त्याप्रकरणी संशयिताना अटक करण्यात आली आहे.

संशयित आरोपी
author img

By

Published : Jun 22, 2019, 12:33 PM IST

सांगली - पत्नीला पळवल्याच्या रागातून तरुणाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी २ संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सचिन होळीकट्टी आणि चंद्रकांत पुजारी, असे या संशयितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेताना पोलीस

शहरातील गोकुळनगरातील तात्यासाहेब मळा येथे एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. गणेश रजपूत (वय २५) असे त्या मृत तरुणाचे नाव होते. गणेशने सचिन होळीकट्टीच्या पत्नीला काही महिन्यापूर्वी पळवून नेले होते. याच रागातून सचिनने आपल्या साथीदाराच्या साहाय्याने गणेशला रिक्षात टाकून तात्यासाहेब मळा येथील एका निर्जन स्थळी नेले. त्याठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये हात बांधून त्याला लाकडी काठीने मारहाण करून त्याची हत्या केली होती. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासात गणेशने सचिनच्या पत्नीला पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी सचिन आणि त्याच्या साथीदाराच्या मुसक्या आवळल्या.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AV

Feed send file name - MH_SNG_MURDER_AROPI_ATAK_22_JUNE_2019_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_MURDER_AROPI_ATAK_22_JUNE_2019_VIS_3_7203751

स्लग - पत्नीस पळवल्याच्या रागातून खून प्रकरणी रिक्षाचालक पतीसह दोघांना अटक..अवघ्या एका तासात आवळल्या मुसक्या...

अँकर / - पत्नीस पळवल्याच्या रागातून तरुणाच्या खून प्रकरणी अवघ्या एका तासात सांगली पोलिसांनी संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. संशयित सचिन होळीकट्टी व चंद्रकांत पुजारी या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
Body: व्ही वो - सांगलीच्या गोकुळनगर मागील तात्यासाहेब मळा येथे एका तरुणाचा निर्घृण खून करण्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती.गणेश रजपुत,वय 25 या तरुणाचा पत्नीला पळवून नेल्याच्या रागातून हा खून करण्यात आला होता.रिक्षाचालक असणाऱ्या सचिन होळीकट्टी व चंद्रकांत पुजारी यांनी सांगलीमध्ये आलेल्या गणेश ह्याच रिक्षातून आपण करून तात्यासाहेब मळा येथील एका निर्जन पत्र्याच्या शेडमध्ये हात बांधून,लाकडी काठीने मारहाण करून हत्या केली होती.ही घटना उघडकीस येताच सांगली शहरांमध्ये एकच खळबळ उडाली होती.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सांगली पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला होता.आणि अवघ्या एका तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयित सचिन होळीकट्टी व चंद्रकांत पुजारी यांच्या मुसक्या आवळता अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.गणेश रजपुत याने सचिन होळीकट्टी त्याच्या पत्नीला काही महिन्यापूर्वी पळवून नेले होते,आणि याच रागातून सचिन होळीकट्टी यांनी हा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.