ETV Bharat / state

रिक्षा भाड्याच्या वादातून दोन गटात जोरदार राडा; दहा वाहनांची तोडफोड - रिक्षा

या रागातून रिक्षाचालक शेख यांनी इसाक माणिकभाई यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली.

रिक्षा भाड्याच्या वादातून दोन गटात जोरदार राडा
author img

By

Published : May 11, 2019, 7:06 PM IST

सांगली - रिक्षा भाड्याच्या पैशाच्या वादातून सांगलीतील सुभाषनगर येथे दोन गटात जोरदार राडा झाला आहे. यामध्ये दहा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या भांडणामध्ये एक चार चाकी व ९ दुचाकी वाहनांचा समावेश आहे. मिरजेच्या सुभाषनगरमध्ये रिक्षाचालक आणि मालक यांच्यात हा प्रकार घडला. दोन्ही गटातील ६ जणांवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षा भाड्याच्या वादातून दोन गटात जोरदार राडा

रिक्षा मालक आणि चालक यांच्यात रिक्षा भाड्याच्या पैशाच्या वादातून राडा झाला आहे. यावेळी सुभाषनगर येथे झालेल्या राड्यात ८ ते १० दुचाकींची तोडफोड करण्यात आली आहे. इसाक माणिकभाई यांची रिक्षा असून ती त्यांनी रियाज शेख यांना भाड्याने चालवण्यास दिली होते. मात्र त्याचे भाडे शेख यांच्याकडून मिळत नसल्याने माणिकभाई यांच्यात भाड्याच्या पैशातून वाद झाला होता.

या रागातून रिक्षाचालक शेख यांनी इसाक माणिकभाई यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. तसेच यावेळी माणिकभाई यांच्या मालकीच्या मारुती व्हॅनवर दगडफेक करण्यात आली. या राड्यात सुमारे ८ ते ९ दुचाकी वाहनांच्या तोडफोड झाली. या सर्व दुचाक्या या शेख गटाच्या असून राड्या दरम्यान तिथेच टाकून पळ काढला आहे. या राड्याप्रकरणी दोन्ही गटाने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधात तक्रार दाखल केल्या असून दोन्ही गटाच्या सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे सुभाषनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AV

Feed send file name - R_MH_1_SNG_11_MAY_2019_TODFOD_SARFARAJ_SANADI - to - R_MH_4_SNG_11_MAY_2019_TODFOD_SARFARAJ_SANADI

स्लग - रिक्षा भाड्याच्या वादातून दोन गटात जोरदार राडा,दहा वाहनांची करण्यात आली तोडफोड...

अँकर - पैश्याच्या वादातून दोन गटात जोरदार राडा झाला असून यामध्येे दहा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.यामध्ये एक चार चाकी व ९ दुचाकी वाहनांची समावेश आहे.मिरजेच्या सुभाषनगर मध्ये रिक्षा चालक आणि मालक यांच्यात हा प्रकार घडला असून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या सहा जणांवर गुन्हे दाखल. Body:व्ही वो - रिक्षा मालक आणि चालक यांच्यात रिक्षा भाड्याच्या पैश्याच्या वादातून तुंबळ राडा झाला आहे. सुभाषनगर येथे यावेळी झालेल्या राड्यात आठ ते दहा दुचाकींची तोडफोड करण्यात आली आहे.इसाक माणिकभाई यांची रिक्षा असून ती त्यांनी रियाज शेख यांना भाड्याने चालवण्यास दिली होते. मात्र त्याचे भाडे शेख यांच्याकडून मिळत नसल्याने माणिकभाई यांच्यात भाड्याच्या पैश्यातुन वाद झाला होता. आणि यारागातुन रिक्षा चालक शेख यांनी इसाक माणिकभाई यांच्याघरावर हल्ला चढवला,यावेळी दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली.तसेच यावेळी माणिकभाई यांच्या मालकीची मारुती व्हॅनवर दगडफेक करण्यात आली.तर या राड्यात सुमारे ८ ते ९ दुचाकी वाहनांच्या तोडफोड झाली आहे.या सर्व दुचाकया या शेख गटाच्या असून राड्या दरम्यान तिथेच टाकून पळ काढला आहे.तर या राड्याप्रकरणी दोन्ही गटाने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात एकेमकांच्या विरोधात परस्परविरोधात तक्रार दाखल केल्या असून दोन्ही गटाच्या सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तर याराडयामुळे सुभाषनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.Conclusion:null

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.