सांगली - भरधाव डंपरच्या धडकेत पिता-पुत्र जागीच ठार झाले आहेत. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. इस्लामपूर मार्गावरील गोटखिंडी फाटा येथे हा भीषण अपघात झाला आहे. अंकुश शिवाजी साळुंखे ( वय 40 ), आदित्य अंकुश साळुंखे ( वय 13 ) असे मृतांची नावे आहेत. तर सोनाली अंकुश साळुंखे ( वय 35 ) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. मृत पिता-पुत्रा व जखमी महिला हे कराड तालुक्यातील आहेत.
पिता-पुत्राच्या डोक्याच्या चेंदामेंदा : हे कुटुंब सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील हजारमाची येथील असून कामानिमित्ताने सांगली जिल्ह्यात आले होते. आष्टा ते इस्लामपूर मार्गावरून ते घराकडे निघाले असता, इस्लामपूर मार्गावरील गोटखिंडी फाटा याठिकाणी आष्टयाच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात भरधाव डंपरने साळुंखे कुटुंबाच्या दुचाकी गाडीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती, यामध्ये गाडीवरील सोनाली साळुंखे गाडीवरून दूर फेकल्या गेल्या, तर वडील अंकुश आणि आदित्य साळुंखे पिता-पुत्रांच्या डोके अपघातामध्ये चेंदामेंदा होऊन दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सोनाली साळुंखे या गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघाताची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - नवरदेवाला गंडविणाऱ्या टोळीची सदस्या जेरबंद, बनावट लग्न लावून अनेकांना फसवले