सांगली - कुपवाड एमआयडीसीमधील फौंड्रीतून कास्टींग चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कंपनीच्या सुपरवायझरसह टेम्पो चालकाचा समावेश असून त्यांच्याकडून चोरीतील सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कुपवाड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
कंपनीचा सुपरवायझर निघाला चोर
कुपवाड एमआयडीसीतील वेस्टर्न प्रेसिकास्ट प्रा.लिमिटेड या फौंड्रीतून सुपरवायझर व टेम्पोचालक यांनी संगनमताने चार लाखाच्या कास्टींग साहित्याची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कुपवाड पोलिसांनी संशयातून कंपनीतील सुपरवायझर राजेंद्र सुरेश साळुंखे व टेम्पो चालक निरंजन तुकाराम चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, दोघांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्या ताब्यातील चोरलेले चार लाखाचे कास्टिंग साहित्य व चोरीतील टेम्पो, असा मिळून सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हेही वाचा - क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या धक्क्याने खेळाडूचा मृत्यू