सांगली - लॉकडाऊनचा फायदा घेत शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि चोरट्यांना रंगेहात पकडण्यात यश आले आहे. विश्रामबाग पोलिसांनी एटीएम फोडताना दोघा चोरट्यांना अटक केली आहे.
एटीएम फोडून चोरी करणाचा प्रयत्न
लॉकडाऊनमध्ये शहरातल्या शंभर फुटी रोड येथील त्रिमूर्ती चौक येथे असणाऱ्या एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये घुसून एटीएम मशीन फोडण्याचा प्रकार समोर आला आहे. या एटीएम सेंटरमध्ये दोन चोरटे एटीएम मशीन फोडून चोरी करत असल्याची बाब परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यातून इतर सहकाऱ्यांना या बद्दल माहिती दिली. माहिती मिळताच, पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी एटीएम मशीन फोडून पैसे चोरी करताना रंगेहात पकडले आहे. चेतन पोळ(वय 26) आणि विनायक शिंदे(वय 26) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून दोघेही सांगली शहरातील रहिवासी आहेत.
एटीएम फोडून चोरी करताना दोघांना रंगेहात अटक - sangali police news
लॉकडाउन काळात सांगली शहरात एटीएम फोडताना दोघा चोरट्यांना अटक केली आहे. विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.