सांगली - रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक मिरजेतून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दोघांपैकी एक मिरजेच्या शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, तर एक खासगी रुग्णालयातील कर्मचारी असून दोघांनी 2 इंजेक्शन 60 हजारांना विकल्याची धक्कादायक माहिती समोर आले आहे. सुमित कोपरकर आणि दाविद वाघमारे, असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे.
रेमडेसिवीरचा काळाबाजार -
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक रुग्णांना इंजेक्शनची मोठी गरज भासत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, अशा परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगली-मिरज रोडवरील विलिंगडन महाविद्यालयाच्या गेट जवळ थांबून रेमडेसिवीर इंजेक्शची विक्री करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले. यानंतर दोघांच्याकडे चौकशी केली असता दोघांनी रुग्णालयातून 2 रेमडेसिवीर इंजकेशन चोरून प्रत्येकी 30 हजार रुपयेप्रमाणे विक्री केल्याची कबुली दिली आहे.
हेही वाचा - ठाकरे सरकारने कोरोना काळात भ्रष्टाचाराचा कळस गाठलाय- भाजपा नेते किरीट सोमैया