ETV Bharat / state

सांगलीत आढळले कोरोनाचे 20 नवे रुग्ण, चार जणांना डिस्चार्ज

रविवारी दुपारपर्यंत वीस जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व रुग्ण मुंबईहून आलेले किंवा मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले आहेत. संबंधित रुग्णांचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करत सील करण्यात आला आहे.

new corona patients in sangli
सांगलीत आढळले कोरोनाचे 20 नवे रुग्ण
author img

By

Published : Jun 14, 2020, 7:13 PM IST

सांगली - जिल्ह्यात रविवारी तब्बल २० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २४२ झाली आहे. यातील १२१ जण कोरोनामुक्त झाले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात शिराळा तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

रविवारी दुपारपर्यंत २० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व रुग्ण मुंबईहून आलेले किंवा मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यातील मणदूर या एकाच गावातील नऊ जणांचा समावेश आहे. तर, खानापूर तालुक्यातील भाळवणी, वाळवा तालुक्यातील वाटेगांव, येलूर इस्लामपूर, तासगाव तालुक्यातील गव्हाण, माजर्डे, पलूस तालुक्यातील दुधोंडी, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील अंकली येथील रुग्णांचा समावेश आहे. सर्वांना मिरजेच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

संबंधित रुग्णांचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करत सील करण्यात आला आहे. रविवारी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये शिराळा तालुक्यातल्या रिळे येथील एक, माळेवाडी येथील २ जण, तासगावमधील एक आणि आटपाडीच्या शेटफळेमधील एकाचा समावेश आहे. या सर्वांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन १४ दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले आहे.

सध्या शिराळा तालुक्यात ७७ कोरोना रुग्ण असून यात एकट्या मणदूर गावातील ४७ जणांचा समावेश आहे. त्यामुळे, जिल्ह्यातला शिराळा तालुका आणि तालुक्यातील मणदूर गाव हे कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे. जिल्ह्यात सध्या ११३ रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत १२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.