ETV Bharat / state

४०० वर्षांचा वटवृक्ष वारकऱ्यांच्या आश्रयाचे ठिकाण, संवर्धनासाठी वृक्षप्रेमींचे चिपको आंदोलन

मिरज-पंढरपूर मार्गावर हे भले मोठे वडाचे झाड असून या झाडाने अनेकांना सावली देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर वर्षानुवर्षे या झाडाच्या मार्गावरून पंढरपूरच्या वारीसाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी हक्काचे सावली देणारे हे झाड आहे. याठिकाणी असणाऱ्या यल्लमा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांचे ऊन, पाऊस यापासून नेहमी संरक्षण करत आहे. कोकण, कर्नाटक आणि सांगली जिल्ह्यातून विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारा प्रत्येक वारकरी नक्की झाडाचा आश्रय घेतो.

author img

By

Published : Jul 15, 2020, 7:03 PM IST

conservation of banyan tree sangli  sangli latest news  tree lovers agiation sangli  वृक्षप्रेमींचे चिपको आंदोलन सांगली  सांगली लेटेस्ट न्यूज
४०० वर्षांचा वटवृक्ष वारकऱ्यांच्या आश्रयाचे ठिकाण, संवर्धनासाठी वृक्षप्रेमींचे चिपको आंदोलन

सांगली - मिरज-पंढरपूर मार्गावरील भोसेनजीक महामार्गाच्या रस्त्याच्या कामाच्या निमित्ताने वटवृक्षाची कत्तल करण्यात येत आहे. याविरोधात सांगलीतील वृक्षप्रेमींनी एकत्र येऊन ४०० वर्षांच्या वृक्षाच्या संवर्धनासाठी चिपको आंदोलन करत चळवळ सुरू केली आहे.

सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-रत्नागिरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्ते कामासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येत आहे. मात्र, मिरज-पंढरपूर मार्गावरील असणाऱ्या एका झाडाच्या कत्तलीवरून आता आंदोलन सुरू झाले आहे. भोसेनजिक असणाऱ्या यल्लमा देवीच्या मंदिरातील एक ४०० वर्षांपूर्वीचे जीर्ण आणि विस्तीर्ण असे वटवृक्ष तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, सांगलीतील वृक्ष प्रेमींनी याला विरोध केला आहे. या वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी एकजूट झाले आहेत. तसेच झाड वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. आज झाडाच्या ठिकाणी वृक्षप्रेमींनी एकत्र येऊन झाड वाचवण्यासाठी प्रतिकात्मक चिपको आंदोलन केले आहे. ४०० वर्षांचा हा ठेवा असून हे झाड तोडून टाकण्याऐवजी जोपासले पाहिजे. हे झाड तोडण्यापेक्षा त्याच्या बाजूने रस्ता काढणे हा पर्याय आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत झाड तोडू देणार नाही. यासाठी तीव्र जनआंदोलन छेडू, असा इशारा वृक्षप्रेमींनी दिला आहे. याठिकाणी असणाऱ्या यल्लमा मंदीर प्रशासनानेही झाडाचे जतन करण्यासाठी त्यांची जागा देण्यासाठी समंती दर्शवली आहे.

वारकऱ्यांच्या विसाव्याचे ठिकाण -

मिरज-पंढरपूर मार्गावर हे भले मोठे वडाचे झाड असून या झाडाने अनेकांना सावली देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर वर्षानुवर्षे या झाडाच्या मार्गावरून पंढरपूरच्या वारीसाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी हक्काचे सावली देणारे हे झाड आहे. याठिकाणी असणाऱ्या यल्लमा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांचे ऊन, पाऊस यापासून नेहमी संरक्षण करत आहे. कोकण, कर्नाटक आणि सांगली जिल्ह्यातून विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारा प्रत्येक वारकरी नक्की झाडाचा आश्रय घेतो.

वनविभाग काय करतंय? -
अजून किमान ६०० वर्ष आयुष्य असणाऱ्या या वटवृक्षाचे जतन करण्यासाठी ग्रामस्थ, यल्लमा देवी मंदिर प्राशसनाने शासन दरबारी आणि वनविभागाला अनेकवेळा विनंती केली आहे. मात्र, याकडे केवळ दुर्लक्ष करण्यात आले आहे. वास्तविक या वृक्ष संवर्धनासाठी वन विभागाने पुढे येऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते, असे मत यल्लमा देवी मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष शिवाजी काळे यांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.