ETV Bharat / state

पुरुषांना काठीने बदडून महिला साजरी करतात अनोखी होळी - sangli

झेंडा पळवण्यासाठी येणाऱ्या पुरुषांना महिला हातातील लाठ्या-काठ्यांनी बदडून काढत पिटाळून लावतात. या खेळाच्या निमित्ताने महिलाकडून पुरुषांची यथेच्छ धुलाई होते. मात्र, एरवी पत्नीस मारहाण करणारे पती यानिमित्ताने महिलांकडून आनंदाने मार खात असतात.

झेंडा पळवण्यासाठी आलेल्या पुरुषांना महिला काठीने मारतात
author img

By

Published : Mar 24, 2019, 8:21 AM IST

सांगली - दरवर्षी पुरुषांना काठीने बेदम बदडून काढत अनोखी होळी सांगलीच्या मिरजेत गोसावी समाजाच्या महिला साजरी करत असतात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून गोसावी समाज जोपासत आहे. लाठीचा खेळ या माध्यमातून ही आगळी-वेगळी होळी महिला आणि पुरुष खेळतात.

झेंडा पळवण्यासाठी आलेल्या पुरुषांना महिला काठीने मारतात

देशभरात होळीचा सण वेगवेगळ्या परंपरेच्या माध्यमातून ठिकठिकाणी साजरा केला जातो. अशीच एक वेगळी परंपरा सांगलीच्या मिरजेत होळीच्या निमित्ताने पाहायला मिळते. गोसावी समाजाकडून शेकडो वर्षांपासून या ठिकाणी होळीचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. यामध्ये महिला पुरुषांची धुलाई करत होळी साजरी करत असतात.

काय आहे खेळ -
शेकडो वर्षांपासून गोसावी समाजात होळीच्या निमित्ताने तिसऱ्या दिवशी "झेंड्याचा खेळ" खेळला जातो. गल्लीच्या मध्यभागी महिलांच्या गराड्यात झेंडा रोवला जातो. ज्यामध्ये पैसे बांधून ठेवले जातात. त्याची कमान महिलांच्या हातात असते. हा झेंडा पळवण्याचे आव्हान पुरुषांसमोर असते. तर या झेंड्याच्या संरक्षणाची जबाबदारी महिलांची असते. हातात काठी घेऊन महिला या झेंड्याचे संरक्षण करतात.

रंगाची उधळण करत झेंडा पळवण्याचा खेळ खेळला जातो. यामध्ये झेंडा पळवण्यासाठी येणाऱ्या पुरुषांना महिला हातातील लाठ्या-काठ्यांनी बदडून काढत पिटाळून लावतात. या खेळाच्या निमित्ताने महिलाकडून पुरुषांची यथेच्छ धुलाई होते. मात्र, एरवी पत्नीस मारहाण करणारे पती यानिमित्ताने महिलांकडून आनंदाने मार खात असतात.

Intro:सरफराज सनदी - सांगली

PKG - स्पेशल .

Feed send - file name - R_MH_1_SNG_22_MARCH_2019_ANOKHI_HOLI_SARFARAJ_SANADI - TO -
R_MH_4_SNG_22_MARCH_2019_ANOKHI_HOLI_SARFARAJ_SANADI

स्लग - पुरुषांना बदडून काढता महिला साजरी करतात अनोखी होळी..

अँकर - महिलांकडून पुरुषांना बेदम बदडून काढत अनोखी होळी सांगलीच्या मिरजेत साजरी करण्यात येते.शेकडो वर्षांपासून गोसावी समाजाकडून अनोखी होळीची परंपरा जोपासण्यात येते,लाठीचा खेळ यामाध्यमातून ही आगळी-वेगळी होळी महिला आणि पुरुष खेळतात.

Body:व्ही वो - देशभरात होळीचा सण वेगवेगळ्या परंपरेच्या माध्यमातून ठीकठिकाणी साजरा केला जातो.अशीच एक वेगळी परंपरा सांगलीच्या मिरजेत होळीच्या निमित्ताने पहायला मिळते.
गोसावी समाजाकडून शेकडो वर्षांपासून या ठिकाणी होळीचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येतो,महिलांकडून पुरुषांची धुलाई करत होळी साजरी करण्याची ही परंपरा आहे.शेकडो वर्षांपासून गोसावी समाजात होळीच्या निमित्ताने तिसऱ्या दिवशी "झेंड्याचा खेळ" खेळला जातो.गल्लीच्या मध्यभागी महीलांच्या गराड्यात झेंडा रोवला जातो,
ज्यामध्ये पैसे बांधून ठेवले जातात.व त्याची कमान महिलांच्या हातात असते.आणि हा झेंडा पाळवण्याचे आव्हान पुरुषांसमोर असते.तर या झेंड्याची जवाबदार महिलांची असते,हातात काठी घेऊन महिला या झेंड्याचे संरक्षण करतात,आणि रंगाची उधळण करत झेंडा पळवण्याचा खेळ सुरू होता,यामध्ये झेंडा पाळवण्यास येणाऱ्या पुरुष मंडळींना महिला हातातील लाठ्या - काठ्यांनी बदडून काढत पिटाळून लावतात.

बाईट - राजू गोसावी - मिरज ,

बाईट -

व्ही वो - या खेळाच्या निमित्ताने महिला पुरुषांची यथेच्छा धुलाई करतात,तर एरवी पत्नीस मारहाण करणारे पती यानिमित्ताने महिलांकडून आनंदाने मार खात असतात.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.