ETV Bharat / state

Warkari accident : पायी निघालेल्या दिंडीत कारची धडक, 3 वारकरी जखमी - पायी निघालेल्या दिंडीत गाडी घुसन 3 वारकरी जखमी

आटपाडीतल्या दिघंची जवळ पायी निघालेल्या दिंडीला अपघात ( Accident to Dindi on foot near Digha ) झाला आहे. भरधाव गाडीची धडक बसल्याने तीन वारकरी गंभीर जखमी ( Three people were seriously injured ) झाले आहेत.

Warkari accident
पायी निघालेल्या दिंडीत गाडी घुसन 3 वारकरी जखमी
author img

By

Published : Nov 2, 2022, 10:07 AM IST

सांगली : आटपाडीतल्या दिघंची जवळ पायी निघालेल्या दिंडीला अपघात ( Accident to Dindi on foot near Digha ) झाला आहे. भरधाव गाडीची धडक बसल्याने तीन वारकरी गंभीर जखमी ( Three people were seriously injured ) झाले आहेत. सोलापूरच्या जुनोनी इथले वारकरी अपघाताची घटना ताजी असतानाच पुन्हा वारकऱ्यांच्या दिंडीत गाडी घुसल्याच्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

पायी दिंडीत गाडी घुसून अपघात : आटपाडीच्या दिघंची मार्गे पंढरपूरकडे कार्तिकी एकादशी Kartiki Ekadashi निमित्ताने निघालेल्या पायी दिंडीत गाडी घुसून अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कडेगाव तालुक्यातल्या मोहिते वडगाव येथील 30 ते 40 जणांची पायी दिंडी पंढरपूरकडे निघाली होती. दिघंची गावापासून तीन किलोमीटर दिंडी पोहचली असताना मागून भरधाव आलेल्या चारचाकी गाडीने दिंडीतल्या तिघा जणांना उडवले आहे.समोरून येणाऱ्या दुचाकीला चुकवण्याच्या नादात हा अपघात घडला आहे.

वारकरी संप्रदायामध्ये भीतीचे वातावरण या अपघातात भीमराव पांडुरंग जाधव, वय 75, धनाजी राजाराम मोहिते, वय 40 आणि शिवाजी मारुती मोहिते वय 50 हे जखमी झाले आहेत. जखमींना आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तरी या घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये झाली. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या जुनोनी या ठिकाणी 31 ऑक्टोबर रोजी पायी निघालेल्या दिंडीत भरधाव चारचाकी गाडी घुसून 7 जण ठार झाल्याची घटना अजून ताजी असताना, दुसऱ्याच्या दिवशी पायी निघालेल्या दिंडीला झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे वारकरी संप्रदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अशी घडली सोलापूरच्या जुनोनी इथले वारकरी अपघाताची घटना : पंढरपूरला पायी निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला पडला आहे. दिंडीत कार घुसल्याने ८ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ६ जण गंभीर जखमी झाले असून जखमींना सांगोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कार्तिक यात्रेच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातल्या जठारवाडी येथील वारकरी पायी पंढरपूर कडे निघाले होते. सायंकाळी सातच्या दरम्यान दिंडी सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातील जुनोनी जवळ पोहोचली होती. त्याचवेळी मिरज पंढरपूर मार्गावर मिरजेकडून येणार एका भरधाव गाडी त्या दिंडीमध्ये मागून येऊन घुसली आणि वारकऱ्यांना चिरडत पुढे जाऊन थांबली. विठुरायाचे भक्तीत तल्लीन असलेल्या भक्तांना काही कळायच्या आता घडलेल्या घटनेत आठ जण हे जागीच ठार झाले. ज्यामध्ये ५ महिला, २ पुरुष आणि एक लहान मुलाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. या दिंडीमध्ये 32 जण विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.