सांगली पूर्व वैमन्स्यातून खून केल्याप्रकरणी तिघांना जन्मठेपेची शिक्षा Three sentenced life imprisonment Sangli ठोठावण्यात आली आहे. सांगली न्यायालयाने Sangli court decision on Sanjay Bhat Murder case हे शिक्षा सुनावली आहे. बारा वर्षांपूर्वी सांगली शहरांमध्ये घडलेल्या संजय भाट खून Sanjay Bhat murder case Sangli प्रकरणी अशोक पाटील, प्रकाश गवळी आणि अमित कांबळे या तिघांनाही शिक्षा सुनावण्यात Three sentenced in Sanjay Bhat murder case आली आहे.
फलकावरील फोटो फाडण्यावरून पेटला वाद सांगली शहरातल्या अहिल्यानगर या ठिकाणी 17 नोव्हेंबर 2015 रोजी संजय भाट या व्यक्तीचा धारदार शस्त्रांनी खून करण्यात आला होता. या प्रकरणी अशोक पाटील, प्रकाश गवळी आणि अमित कांबळे यांच्या विरोधात एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यामध्ये MIDC in Kupwad Police Station खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. मुख्य आरोपी अशोक पाटील याच्या पत्नीचे आणि मृत संजय भाट येथे संबंध होते. याबाबत संशयित अशोक पाटील यांनी संजय भाट यांना पोलिसात तक्रार देणार असल्याची धमकी दिली होती. त्यानंतर संजय भाट यांनी अशोक पाटील यांना एक लाख रुपये दिल्यानंतर प्रकरण थांबले होते. त्यानंतर दोघांचेही बोलणे बंद झाले होते. मात्र काही दिवसानंतर संजय भाट याच्या मित्राच्या वाढदिवस निमित्ताने अहिल्यानगर चौकात वाढदिवसाच्या शुभेच्छांचा डिजिटल फलक लावण्यात आला होता. ज्यावर संजय भाट याचा फोटो ब्लेडने फाडण्यात आला होता. यातून अशोक पाटील आणि संजय भाट यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले होते.
तिघांना जन्मठेप आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा त्यानंतर सायंकाळच्या सुमारास संजय भाट हे आपल्या मित्राच्या समवेत मोटरसायकल वरून जात असताना अशोक पाटील आणि त्याच्या साथीदारांनी तलवारी व कोयत्यासह संजय भाट याच्यावर हल्ला करत निर्घृण खून केला होता. मात्र जखमी अवस्थेमध्ये असणाऱ्या संजय भाट यांनी आपल्या मेव्हण्यातला या सर्व प्रकरणाची माहिती दिली होती. या खुनाचा खटला सांगली न्यायालयामध्ये सुरू होता. या खटल्याची अंतिम सुनावणी गुरुवारी पार पडली. ज्यामध्ये सरकारी पक्षाकडून 15 साक्षीदार तपासण्यात आले. सबळ पुरावे आणि साक्षच्या आधारे न्यायालयाने मुख्य आरोपी अशोक पाटील, अमित कांबळे आणि प्रकाश गवळी या तिघांनाही दोषी ठरवत जन्मठेप आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच दंड न भरल्यास सहा महिने कठोर सक्त मजुरीची शिक्षा ही सुनावण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून रियाज जमादार यांनी कामकाज पाहिले.