ETV Bharat / state

कोरोनाबाधित सराफ कुटुंबाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, 50 तोळे सोन्याचे दागिने लंपास - sangli bhilwdi jewelers thieves theft 50 tole gold news

राज्यासह देशात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. त्यातच लॉकडाऊन असल्याने व कोरोनाबाधित झाल्याने सांगलीतील भिलवडीतील सराफ कुटुंब इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला. यावेळी त्यांच्या घरातील ५० तोळे सोन्याचे दागिने लंपास केली.

thieves theft 50 tole gold ornaments from quarantine bhilwdi jewelers in sangli
कोरोनाबाधित सराफ कुटुंबाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला
author img

By

Published : Sep 15, 2020, 7:15 PM IST

Updated : Sep 15, 2020, 7:57 PM IST

सांगली - कोरोनाबाधित एका सराफाच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. यावेळी 50 तोळ्याहून अधिक सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. कोरोनावर रुग्णालयात उपचार सुरू असताना सांगलीच्या भिलवडीमध्ये हा प्रकार घडला.

कोरोनाबाधित सराफ कुटुंबाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, 50 तोळे सोन्याचे दागिने लंपास
या घटनेची पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की सांगलीच्या भिलवडी येथील सराफ सुरेश बाळकृष्ण पोतदार यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार घडला. पोतदार कुटुंब काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांनंतर उपचारासाठी सर्व पोतदार कुटुंब उपचारासाठी सांगलीच्या रुग्णालयात दाखल होते. तिथे उपचार घेऊन हे कुटुंब इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये होते. दोन दिवसांनंतर सर्व कुटुंब घरी परतणार होते. मात्र, आज सकाळी त्यांच्या घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात असणारे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ५०० ग्रॅम सोन्याचे वेगवेगळे दागिने यावेळी चोरी करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरी करताना चांदीचे दागिने चोरी केले नाहीत, केवळ सोन्याचे दागिने चोरी केली आहेत. तर हा चोरीचा प्रकार समोर येताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला आहे.

Last Updated : Sep 15, 2020, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.