सांगली - चोरट्यांनी आधी जेसीबी चोरला ( JCB Theft ). त्यानंतर जेसीबी एटीएम मशीन फोडून पैसे सिनेस्टाईल चोरी केल्याचा प्रकार समोर आला ( Thives Broke ATM In Miraj ) आहे. ही सर्व थरारक घटना सीसीटीव्ही व्हिडिओत कैद झाली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ( Miraj Rural Police ) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरज तालुक्यातील आरग येथे ही घटना घडली आहे. चोरट्यांनी जेसीबी घेऊन थेट एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांची चाहूल लागताच, एटीमएम मशीन तिथेचे सोडून चोरट्यांनी जेसीबीसह पोबारा केला होता. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख आणि सांगली पोलीस दलाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी चोरांच्या पकडण्यासाठी दोन पथके रवाना केली आहे. तर, एटीएम मशीन फोडण्यासाठी वापरण्यात आलेला जेसीबी गावापासून काही अंतरावर आढळून आला आहे.
अशी झाली चोरी - चोरट्यांनी आधी गावातील एका पेट्रोल पंपावर थांबलेला जेसीबी चोरला. तो जेसीबी घेऊन चोरट्यांनी गावातील अॅक्सिस बँकेचे एटीएम सेंटर गाठले. सुरुवातीला एटीएम सेंटर मध्ये एका चोरट्याने प्रवेश करत डोकावून पाहिले. त्यानंतर थेट जेसीबी एटीएम सेंटर मध्ये घुसवून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. पण, मशीन फुटली नाही. त्यामुळे चोरट्यांचा हाताला काहीच लागले नाही. मात्र, जर मशीन फुटली असती तर, त्यातील 27 लाखांच्या पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारला असता.
हेही वाचा - Rana couple sent to judicial custody : राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, राजद्रोहचा गुन्हा