ETV Bharat / state

रंगभूमी दिन विशेष : सोनेरी इतिहासाच्या नाट्यपंढरीची बकाल अवस्था

5 नोव्हेंबर हा दिवस मराठी नाट्य सृष्टीत 'रंगभूमी दिन' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. 'नाट्य पंढरी' म्हणून सांगली जिल्ह्याची ओळख आहे. नाट्य पंढरी दिनानिमित्त 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा आढावा...

author img

By

Published : Nov 5, 2020, 12:52 PM IST

रंगभूमी दिन विशेष
रंगभूमी दिन विशेष

सांगली - 'नाट्य पंढरी' म्हणून सांगली जिल्ह्याची ओळख आहे. 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी नाट्य सृष्टीत 'रंगभूमी दिन' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. मात्र ज्या रंगभूमीने मराठी सृष्टीचा पाया रचला, त्या नाट्यपंढरी "सांगली"ची अवस्था आज दयनीय आहे. विष्णुदास भावे यांच्यामुळे सुरू झालेला हा सोनेरी प्रवास, सध्या काळोख अंधाराच्या दिशेने सुरू आहे की काय? असा प्रश्न सांगलीकडे पहिल्यावर निर्माण झाल्या शिवाय राहत नाही.

सोनेरी इतिहासाच्या नाट्यपंढरीची बकाल अवस्था !

रंगभूमीचा इतिहास...

सांगलीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी मराठी नाटकाला जन्माला घातले. त्यामुळे मराठी रंगभूमी आज विष्णुदास भावे यांच्या समोर नतमस्तक होते. 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीवरील पहिले नाटक सांगलीच्या भूमीवर सादर केले. "सीता स्वयंवर" असे या नाटकाचे नाव होते. त्यांनतर सांगली मधून रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि नाट्य रंगभूमीचा सोनेरी प्रवास सुरु झाला. बालगंधर्व, गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी खाडिलकर, वासुदेव खरे, मास्टर अविनाश अशा अनेक दिगग्ज कलावंतांनी रंगभूमीला अजरामर केल्याचा सुवर्ण इतिहास आहे.

अशी झाली रंगभूमी दिनाची सुरुवात...

रंगभूमी दिन याबाबत सांगलीतील ज्येष्ठ नाट्यकर्मी व लेखक-दिग्दर्शक राजेंद्र पोळ सांगतात, आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी सांगलीच्या रंगभूमीवर पहिले नाटक सादर केले. तो 1843 चा काळ होता. अनेक वर्षांपासून 5 नोव्हेंबर हा मराठी "रंगभूमी दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. अनेकांना 5 नोव्हेंबर हा दिवस म्हणजे विष्णुदास भावे यांनी जे पहिले नाटक सादर केले तो हा दिवस असल्याचे गैरसमज आहे. पण तसे नसून 1843 नंतर शंभर वर्षांनी म्हणजे 1943 मध्ये सांगलीच्या रंगभूमीत "शतसांवत्सरिक नाट्य संमेलन" पार पडले होते. त्याचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर वी.द.सावरकर होते आणि या संमेलनामध्ये विष्णुदास भावे यांच्या जन्म व कर्मभूमीत मराठी 'रंगभूमी दिन' साजरा करण्याचा ठराव झाला. तेव्हापासून 5 नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिन साजरी करण्याची परंपरा सुरू झाली आहे.

राजाश्रयाचा असाही सोनेरी काळ...

सांगलीच्या नाट्यपंढरीत ज्यांनी "संगीत नाट्य"ला नवी दिशा देण्याचे काम केले, ते गोविंद बल्लाळ देवल यांनी. देवल यांची अनेक नाटके आजही अजरामर आहेत. त्यांचे साहित्य लेखन दर्जेदार होते. 1897 साली मध्यप्रदेशचे इंदोरचे राजे शिवाजीराव होळकर यांनी नाट्यलेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत गोविंद बल्लाळ देवल यांनी आपली संहिता पाठवली होती. त्यांच्या बाण भट्ट यांच्या कादंबरीवर आधारित संहितेला पहिला क्रमांक मिळाला होता. त्यानंतर होळकर यांनी गोविंद बल्लाळ यांना इंदोर मध्ये बोलवून त्यांचा न भुतो न भविष्यता,असा सत्कार केला होता. देवल यांची व त्यांच्या संहितेची इंदूर शहरांमधून हत्तीवरून मिरवणूक काढली होती. त्याशिवाय त्यांना चांदीची काठी, भरदार पोशाख आणि एक हजार रुपये रोख, असे बक्षीस त्या काळी दिले होते, असा सत्कार शेक्सपिअरच्या पण नशिबी आला नसेल, असे मत पोळ व्यक्त करतात.

सध्याची राज्यनाट्य स्पर्धा आणि बक्षीस...

आज राज्यनाट्य स्पर्धा ही रंगभूमीच्या कलाकारांसाठी एकमेव व्यासपीठ आहे. त्याच्या बक्षीसांची रक्कम सांगण्यासारखी नाही. शिवाय ती रक्कम लवकर मिळत नाही. गेल्या वर्षी झालेल्या राज्य नाट्य स्पर्धांच्या बक्षिसांची रक्कम अद्याप मिळालेली नाही. इतकेच नव्हे तर त्या प्रयोगाचा खर्चही मिळालेला नाही. ही आजच्या मराठी रंगभूमीची भीषण स्थिती आहे, अशी खंत पोळ व्यक्त करतात.

आणि रंगभूमीमुळे बनला बालविवाह कायदा...

गोविंद देवल यांची दोन नाटके खूप गाजली. शारदा आणि कीचक वध ही ती नाटकं. विशेष म्हणजे यातील शारदा नाटकाला इंग्रजांनी पुरस्कृत केले. मात्र कीचक वध या नाटकावर बंदी आणली होती. शारदा नाटक हे बालविवाहाच्या प्रथेविरोधात होते. इंग्रजांनी या नाटकाला पुरस्कृत केले होते. इतकेच नव्हे तर ब्रिटिशांनी त्या वेळी "शारदा बिल" या नावाने बालविवाहच्या प्रथेविरोधात कायदाही बनवला. तेव्हापासून कायदेशीरदृष्ट्या बालविवाहाची प्रथाही बंद झाली. तर कीचक वध हे नाटक इंग्रज शासनाच्या धोरणावर आधारलेले होते. त्यामुळे नाटकात साकारण्यात आलेल्या भूमिका या इंग्रज अधिकाऱ्यांच्या होत्या. इंग्रजांनी कीचक वध नाटकावर बंदी आणली होती. हा सुद्धा या रंगभूमीचा इतिहास आहे.

मराठी रंगभूमीची "जननी" बनली निराधार...

खरंतर मराठी रंगभूमीला सांगलीच्या नाट्यपंढरीने प्रगल्भ बनवले आहे. मराठी रंगभूमीला उर्जितावस्था देण्याचे काम अनेक स्तरावर स्वातंत्र्यपूर्व काळात झाले. रंगभूमीला राजाश्रय मिळाला आणि नाट्य चळवळ समृद्ध बनली. मात्र त्यानंतर रंगभूमीचा सुरू झालेला हा प्रवास टप्प्याटप्प्यांनी अडथळ्याचा बनला. बोल पटामुळे पहिल्यांदा रंगभूमीला धक्का बसला. मात्र संगीत नाटक आणि हौशी, प्रायोगिक रंगभूमीमुळे नाट्य क्षेत्र सावरले. पण गेल्या काही वर्षांपासून रंगभूमीला व सांगलीच्या नाट्यपंढरीला मोठी मरगळ आलेली आहे. राज्याचे सांस्कृतिक खातेही स्वतंत्र आहे. मात्र मराठी रंगभूमीला, ज्या सांगलीच्या नाट्यपंढरीने जन्माला घातले, त्या नाट्यपंढरीकडे दुर्लक्ष करण्यात आले. या रंगभूमीचा इतिहास किंबहुना त्याचा प्रवास हा जतन केला गेला नाही. ज्या भावेंनी रंगभूमीचा पाया रचला, त्यांच्या घराचे सांगलीमध्ये अस्तित्वात सुध्दा नाही. शिवाय त्यांचे साहित्यही जतन करता आलेले नाही. पुढच्या पिढीला रंगभूमीचा इतिहास कळण्यासाठी एखादे संग्रहालय किंवा केंद्र सुद्धा या नाट्यपंढरीमध्ये निर्माण झालेले नाही. ही मोठी शोकांतिका आहे, असे मत पोळ बोलून दाखवतात.

नवोदित कलाकारांची फरफट...

नाट्यपंढरी आणि रंगभूमी हे केवळ आता बिरुदावली मिरवण्यासाठी सांगलीच्या बाबतीत उरला आहे. सांगलीच्या नाट्यपंढरीचा सोनेरी प्रवास किंवा नवोदित कलाकार घडवण्याच्या दृष्टीने सांगली नगरीत कोणतेही प्रयत्न शासन स्तरावरून झाले नाहीत. विष्णुदास भावे नाट्यमंदिर हे एकमेव नाटक सादर करण्याचा सांगली शहरातला नाट्यगृह आहे. तेही खाजगी संस्थेच्या मालकीचा आहे. यांच्या व्यतिरिक्त शासनाचे कोणतेही नाट्यमंदिर किंवा नाट्यग्रह शहरांमध्ये नाही. महापालिका प्रशासनाचे दीनानाथ मंगेशकर हे नाट्यगृह आहे. पण ते भग्नावस्थेत असून केवळ नावापुरताच उरले आहे. याबाबत कलाकार असणारा सागर चौगुले सांगतो, गेल्या 14 वर्षांपासून आपण या क्षेत्रात संघर्ष करतोय आणि छोटी-मोठी भूमिका आपण केल्या आहेत. पण हे सर्व करत असताना नाट्यपंढरी म्हणून या ठिकाणी कलाकार किंवा नवोदित कलाकारांना घडवण्याच्या दृष्टीने कोणतेचं साधने उपलब्ध नाहीत, हे प्रकर्षाने जाणवते. सांगलीतील अनेक नाट्य संस्था किंवा नवोदित कलाकारांना आपली नाटकाची तालीम करायची असल्यास कुठेतरी भाड्याने हॉल घ्यावा लागतो किंवा कोणाच्या तरी घरात, टेरीसवर प्रॅक्टिस करावी लागते. त्यामुळे शासनाने किमान एखादी जागा देऊन त्या ठिकाणी हॉल बांधून द्यावा, अशी मागणी सागर चौगुले यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.