सांगली - शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आयर्विन पुलाचा 90 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या पुलाच्या बांधणीसाठी काम 106 वर्षांच्या आजीबाईंच्या उपस्थितीत पेढे वाटून आयर्विन पुलाचा वाढदिवस साजरा झाला.
सांगली शहराच्या जडणघडणीपासून अनेक स्थित्यंतरे ऐतिहासिक साक्षीदार म्हणून आयर्विन पूल सांगलीच्या कृष्णा नदीवर मोठ्या दिमाखात उभा आहे. वास्तुकलेचा एका उत्तम नमुना म्हणून या पुलाकडे पाहिले जाते. अत्यंत देखण्या अशा या पुलाला काल (18 नोव्हेंबर) 90 वर्षे पूर्ण झाली आहेत. 18 नोव्हेंबर 1929 मध्ये हा पूल सांगलीचे संस्थानीक पटवर्धन सरकारांनी या पुलाची निर्मिती केली होती. आज या पुलास 90 वर्ष पूर्ण होत आहेत. याच्या औचित्य साधून सांगलीतील हिंदमाता मंडळ या सामाजिक संस्थेच्या वतीने या पुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. यावेळी पुलावर रांगोळी व पणत्या लावून हा पूल रोषणाईने सजवण्यात आले. तर यंदाच्या नव्वदावे वर्ष ओलांडत असताना या पुलाच्या उभारणीसाठी त्यावेळी कामगार म्हणून काम करणाऱ्यांमध्ये एक चिमुरडीही होती. त्या 106 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांच्याच हस्ते म्हणजे लक्ष्मीबाई पुजारी यांच्या हस्ते पुलास हार अर्पण करत पेढे वाटून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. तर या समारंभाला सांगलीच्या महापौर संगीता खोत यांनीही उपस्थितीत लावली होती. यावेळी त्यांच्या हस्ते लक्ष्मीबाई पुजारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या उत्साहात आयर्विन पुलाचा 90 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.