ETV Bharat / state

मिरजेच्या कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती, वेळीच दुरुस्त केल्याने अनर्थ टळला - शासकीय कोरोना रुग्णालय

मिरजेत शासकीय कोरोना रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याची घटना समोर आली आहे. ऑक्सिजन टाकीच्या पाईपलाईनला ही गळती लागली होती. मात्र, तात्काळ अग्निशमक विभागाच्या पथकाने गळती बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. तर, या गळतीचा कोणताही परिणाम रुग्णासेवेवर झाला नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले.

मिरजेच्या कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती, वेळीच दुरुस्त केल्याने अनर्थ टळला

author img

By

Published : Jun 3, 2021, 12:07 AM IST

Updated : Jun 3, 2021, 3:32 AM IST

सांगली - मिरजेत शासकीय कोरोना रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याची घटना समोर आली आहे. ऑक्सिजन टाकीच्या पाईपलाईनला ही गळती लागली होती. मात्र, तात्काळ अग्निशमक विभागाच्या पथकाने गळती बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. तर, या गळतीचा कोणताही परिणाम रुग्णासेवेवर झाला नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले.

मिरजेच्या कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती, वेळीच दुरुस्त केल्याने अनर्थ टळला

'ऑक्सिजनला प्लँटला गळती'

मिरजेच्या कोरोना शासकीय रुग्णालयांमध्ये असणाऱ्या एका ऑक्सिजन प्लांटमधील 6 kl क्षमतेच्या ऑक्सिजन टाकीच्या पाईपलाईनला गळती लागल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. मुख्य टाकीच्या जवळ असणाऱ्या पाईपलाईन मधून गॅस गळती सुरू झाली होती. ही बाब लक्षात येताच तातडीने रुग्णालय प्रशासनाकडून अग्निशमन विभाग व संबंधित दुरुस्त करणाऱ्या पथकाला याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दल व व्हॉल्व दुरुस्त करणारे पथक तातडीने रुग्णालयात परिसरात दाखल झाले. किरकोळ स्वरूपात याठिकाणी गॅसची गळती सुरू होती. पथकाकडून वेळेत गॅस गळतीची दुरूस्ती केली. ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
तर, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी मिरज शासकीय करुणा रुग्णालयात धाव घेत परिस्थितीची पाहणी करत माहिती घेतली.

'रुग्णसेवेवर कोणताही परिणाम नाही'

जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी म्हणाले, रुग्णालयाच्या ठिकाणी सध्या तीन ऑक्सीजन प्लांट असून, 3 ऑक्सिजन साठवण करण्याच्या टाकया आहेत, त्यापैकी मुख्य टाकीच्या असणाऱ्या पाईपलाईनला किरकोळ स्वरूपात गळती लागली होती. मात्र, आता त्याची दुरुस्ती करत गळती थांबवण्यात आली आहे. पण या गळतीचा कोणताही परिणाम रुग्णालयातील रुग्णसेवेवर झाला नाही. कारण अन्य दोन ऑक्सीजन टाकीतून व्यवस्थितरीत्या सुरु आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी सांगत, तरीही प्रशासनाला आणि या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे, जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

Last Updated : Jun 3, 2021, 3:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.