सांगली - महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नियमांच्या कडक अंमलबजावणीसाठी खुद्द महापालिकेचे आयुक्त सोमवारी (दि. 22) रस्त्यावर उतरले होते. सार्वजनिक ठिकाणी जाऊन नितीन कापडणीस यांनी मास्क व सोशल डिस्टंसिंग पालन न करणार्यांच्या विरोधात थेट दंडात्मक कारवाई केली आहे.
कारवाईसाठी आयुक्त उतरले रस्त्यावर
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तर सांगली महापालिका क्षेत्रातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी महापालिका क्षेत्रात सोमवारी खुद्द सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस रस्त्यावर उतरले होते. शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी जाऊन आयुक्त नितीन कापडणीस यांनी मास्क न वापरणाऱ्या तसेच सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली आहेत. थेट आयुक्तांनी अचानक पथकासह सुरू केलेल्या या कारवाईमुळे अनेक दुकानदार आणि व्यवसायिकांची तसेच नागरिकांची धावपळ उडाली होती.
हेही वाचा - महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोरोना चेक पोस्ट सुरू, तपासणीनंतर कर्नाटकमध्ये प्रवेश