ETV Bharat / state

सीबीआयचा छापा म्हणजे राजकीय षडयंत्र- विश्वजित कदम

author img

By

Published : Apr 25, 2021, 12:09 AM IST

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर टाकण्यात आलेला छापा म्हणजे राजकीय षडयंत्र असून केंद्रातले सत्ताधारी सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

कोरोना सेंटरची केली पाहणी
कोरोना सेंटरची केली पाहणी

सांगली - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर टाकण्यात आलेला छापा म्हणजे राजकीय षडयंत्र असून केंद्रातले सत्ताधारी सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

'सीबीआयचा छापा म्हणजे राजकीय षड्यंत्र'

कोरोना सेंटरची केली पाहणी
सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांत बेड्सच्या संख्यावर परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सांगली महापालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक अभिजित भोसले यांनी लोकसहभागातून कोरोना सेंटर सुरू केला आहे. 40 बेड आणि 7 ऑक्सिजन बेड क्षमता असणाऱ्या या सेंटरला स्वर्गीय पतंगराव कदम कोविड सेंटर, असे नाव देण्यात आले आहे. या सेंटरची कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पाहणी केली आहे. अभिजीत भोसले यांनी सुरू केलेल्या या कोरोना सेंटरच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले.

'हे तर राजकीय षड्यंत्र'
माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयकडून टाकण्यात आलेल्या छाप्याबद्दल बोलताना, सीबीआयकडून टाकण्यात आलेला छापा म्हणजे राजकीय षड्यंत्र आहे. तसेच ज्या पद्धतीने सीबीआयचा घटनाक्रम सुरू आहे, तो आश्चर्यचकित करणारा असल्याचं मत मंत्री कदम यांनी व्यक्त करत केंद्रातील असणाऱ्या सत्ताधार्‍यांकडून सीबीआयचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप करत याबाबतचे सत्य लवकरच जनतेसमोर येईल, असा विश्वासही मंत्री कदम यांनी या वेळी व्यक्त केला.

हेही वाचा - पुन्हा आलेले सीबीआयचे पथक अडीच तासांनी परतले, देशमुखांकडून काटोल कोविड सेंटरची पाहणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.