सांगली - कर्नाटकच्या बंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचा ( Shivaji Maharaj Statue Defacement ) घटनेनंतर मिरजेत शिवसैनिकांकडून कर्नाटकच्या वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार घडला आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारकडून कागवाड येथील कर्नाटक राज्याची बॉर्डर बंद करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातून कर्नाटक आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी एसटी सेवा बंद करण्यात आली आहे.
Maharashtra Karnataka Border Sealed : तणाव वाढला, महाराष्ट्राची सीमा कर्नाटक सरकारकडून सील! सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात - एसटी सेवा बंद
कर्नाटकातील बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर आता दोन्ही राज्यांमध्ये तणाव वाढला आहे. कर्नाटकच्या वाहनांना काळे फासण्यासह तोडफोडीचे प्रकार सुरु झाल्याने, कर्नाटक सरकारने महाराष्ट्राची सीमा सील केली ( Maharashtra Border Sealed By Karnataka government ) आहे. तसेच सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला ( Police Contingent Deployed at Karnataka Border ) आहे.
महाराष्ट्राची सीमा कर्नाटक सरकारकडून सील