ETV Bharat / state

शिक्षक झाला रक्षक, बंदोबस्तासाठी सल्लाउद्दीन आत्तार पोलिसांच्या मदतीला

author img

By

Published : Apr 13, 2020, 8:21 AM IST

Updated : Apr 13, 2020, 12:16 PM IST

शिक्षक सल्लाउद्दीन अत्तार हे सुट्टीच्या दिवसांमध्ये कोकरूड पोलिसांसोबत मिळून बंदोबस्तासह जनजागृतीचे काम करत आहेत . ते शिराळा तालुक्यातील वारणावती येथील न्यू इंग्लिश स्कूलचे सहाय्यक शिक्षक आहेत. त्यांचे हे सामाजिक कार्य शिक्षकी पेशासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

बंदोबस्तासाठी सल्लाउद्दीन आत्तार पोलिसांच्या मदतीला

सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत . त्यामुळे, सर्व विद्यार्थी आणि शिक्षक घरीच थांबून शासनाच्या आदेशाचे पालन करत आहेत .अशातच शिक्षक सल्लाउद्दीन अत्तार हे सुट्टीच्या दिवसांमध्ये कोकरूड पोलिसांसोबत मिळून बंदोबस्तासह जनजागृतीचे काम करत आहेत . ते शिराळा तालुक्यातील वारणावती येथील न्यू इंग्लिश स्कूलचे सहाय्यक शिक्षक आहेत.

त्यांचे हे सामाजिक कार्य शिक्षकी पेशासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. शालेय अभ्यासक्रमांमध्ये नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा दल हा शंभर गुणांचा विषय आहे .हा विषय विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता शाळेतील एका शिक्षकाला जिल्हा पोलीस प्रमुखांच्या अधिपत्याखाली प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांना वर्दीही बहाल केली जाते. विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम सांगून समाजात जनजागृती करण्याचे काम या विद्यार्थी व शिक्षकांमार्फत केले जाते. राज्यात जेव्हा नैसर्गिक व मानवी आपत्ती ओढवते त्यावेळी प्रशासनावर ताण येतो. अशावेळी या शिक्षकांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून जिल्हा पोलीस प्रमुखांमार्फत सेवा बजावण्याचे आदेश दिले जातात .

शिराळा वारणावती येथील न्यू इंग्लिश स्कूलचे सहाय्यक शिक्षक सल्लाउद्दीन आत्तार हे शिराळा तालुक्यात एकमेव विशेष पोलीस अधिकारी आहेत .सध्या कोकरूड पोलिसांबरोबर ते गेल्या वीस दिवसांपासून आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत . गेल्या वीस वर्षांपासून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. राजाराम शिक्षण संस्थेसह अनेक ठिकाणचे आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. शाळेसह परिसरातील गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदतीसह ते सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात.

नवी दिल्लीच्या भारतीय सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्रामार्फत देशातील विविध ठिकाणी त्यांनी प्रशिक्षणे घेतली आहेत . त्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यातही ते अग्रेसर असतात. सध्या सर्व शिक्षक सुट्टीनिमित्त घरीच आहेत, मात्र सलाउद्दीन हे कोकरूडचे सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम व कर्मचाऱ्यांसोबत ठिकठिकाणी फिरून बंदोबस्त तसेच जनजागृती करताना दिसत आहेत. आतार हे सुट्टीत जी सेवा बजावत आहेत, त्याबद्दल शासनामार्फत त्यांना कोणतेही मानधन दिले जाणार नाही .तरीही सामाजिक कार्याची संधी म्हणून ते हे कर्तव्य पार पाडत आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम

सुट्टीचा कालावधी कर्तव्यात गेला तरी हरकत नाही, कारण आमचे जीवन सेवेसाठी हे आमचे ब्रीद वाक्यच आहे. शिवाय पगार रूपाने मोबदला मिळतोच आहे. त्यामुळे वेगळ्या मानधनाची अपेक्षा नसल्याचे सल्लाउद्दीन सांगतात .संचारबंदीच्या काळात विशेष पोलीस अधिकारी चांगले काम करत आहेत. तर सल्लाउद्दीन आत्तार यांची आमच्याकडे नियुक्ती आहे . ते आपले काम प्रामाणिकपणे बजावत असून आम्हाला त्यांची मदत होत असल्याचे कोकरूड पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम यांनी सांगितले.

Last Updated : Apr 13, 2020, 12:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.