ETV Bharat / state

मिरज तालुक्यातील लोकेश सुतार टोळीवर तडीपारीची कारवाई - लोकेश सुतार टोळी मिरज

मिरज तालुक्यातील लिंगनूर, आरग परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असणाऱ्या लोकेश सुतार टोळीवर सांगली पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या चार जिल्ह्यातून 5 जणांना 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक दीक्षीत गेडाम यांनी ही कारवाई केली.

सांगली
सांगली
author img

By

Published : Feb 9, 2021, 9:53 PM IST

सांगली - मिरज तालुक्यातील लिंगनूर, आरग परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असणाऱ्या लोकेश सुतार टोळीवर सांगली पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या चार जिल्ह्यातून 5 जणांना 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक दीक्षीत गेडाम यांनी ही कारवाई केली.

5 जणांनी 4 जिल्ह्यातून केले हद्दपार

मिरज तालुक्यातील लिंगनूर व आरग येथील लोकेश सुतार व त्याचे साथीदार पपल्या ऊर्फ पपलेश महादेव पाटील, प्रविण ऊर्फ सुनिल, सुखदेव ऊर्फ बंड्या हणमंत नाईक आणि नानेश ऊर्फ बाळिशा रावसाहेब सुतार या टोळीविरुद्ध सन 2016 ते 2020 मध्ये मिरज ग्रामीण, आष्टा, तासगाव, विटा आणि कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात चोरी करणे, घरफोडी करणे, टोळीची दहशत रहावी, म्हणून बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, कट रचून दरोडा घालणे, असे 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच कायदा न जुमाननारे व कोणाचेही न ऐकणारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये मिरज ग्रामीण पोलिसांनी सांगलीचे पोलीस अधीक्षकांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाचे पोलीस अधीक्षक दीक्षीत गेडाम यांनी अवलोकन करून अधिनियम सन 1951 चे कलम 55 मधील तरतुदीनुसार लोकशे सुतार याच्यासह त्याच्या टोळीतील 5 जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे. या पाचही जणांना सांगली, सातारा, कोल्हापूर व पुणे या चार जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.