सांगली - सांगली लोकसभा मतदार संघाच्या जागेचा तिढा कायम असतानाच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणारे खासदार राजू शेट्टी यांचा यांच्या प्रचारास महाआघाडीमधील नेत्यांची उपस्थिती होती.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मगावातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या प्रचाराला सुरुवात केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम तसेच नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील राष्ट्रीय नेते रामपाल सिंग यांच्यासह सांगली जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.