ETV Bharat / state

केंद्रासह महाराष्ट्र व कर्नाटक सरकारला महापुराबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे 'सर्वोच्च' आदेश - डॉ. अमोल पवार

सांगली, सातारा, कोल्हापूर यासह कर्नाटकमधील अनेक गावांना महापूराचा फटका बसला. शेकडो लोकांची जीवितहानी झाली. त्याचबरोबर लाखो लोकांचे संसार, शेती व्यापार संपूर्ण उध्वस्त झाले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह महाराष्ट्र व कर्नाटक आणि पूरबाधित जिल्हाप्रशासन व पालिका प्रशासनाला नोटीसा बजावल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालय
author img

By

Published : Aug 30, 2019, 7:34 PM IST

सांगली - सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह महाराष्ट्र व कर्नाटक आणि पूरबाधित जिल्हा प्रशासन व पालिका प्रशासनाला नोटीसा बजावल्या आहेत. तसेच महापुराबाबत आजपर्यंत केलेल्या उपाययोजना व पुनर्वसन कामाबद्दल प्रतिज्ञापत्र देखील दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सांगलीच्या पलूसचे याचिकाकर्ते डॉ. अमोल पवार यांनी ही माहिती दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महापुरावरुन सरकारला नोटिस बजावल्या

सांगली, सातारा, कोल्हापूर यासह कर्नाटकमधील अनेक गावांना महापूराचा फटका बसला. शेकडो लोकांची जीवित आणि त्याचबरोबर लाखो लोकांचे संसार, शेती व्यापार संपूर्ण उध्वस्त झाले आहेत. कोयना व राधानगरी धरणातून करण्यात आलेला विसर्ग, अलमट्टी धरणात अडवलेले पाणी त्यानंतर अलमट्टी धरणातून करण्यात आलेला विसर्ग यामुळे कर्नाटकमध्ये महापुर आला. त्यामुळे अतोनात नुकसान झाले. शासनाकडून पूरग्रस्तांना देण्यात येणारी तुटपुंजी मदतीच्या पार्श्वभूमीवर व एकूणच पुरपरिस्थितीवरुन सांगलीच्या पलूस येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार व कर्नाटक सरकार यांना नोटीस बजावली आहे. तसेच महापुराबाबत आजपर्यंत केलेल्या उपाययोजना व पुनर्वसनबाबत केलेल्या कामाबद्दलचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकारी यांनाही नोटीस बजावली आहे. त्यांना आपआपल्या जिल्ह्यात करीत असलेल्या महापूर पुनर्वसन व मदतीच्या कामाबाबत सविस्तर अहवाल प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून मागवण्यात आले आहे. तसेच कर्नाटक सरकारला सांगली, कोल्हापूर महापुराबाबत अलमट्टी कितपत जबाबदार आहे. शिवाय महापुरात अलमट्टी धरण प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना याबाबत माहिती मागवली आहे. त्याचबरोबर महापुराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील अलमट्टी, हिप्परगी व महाराष्ट्रातील कोयना, चांदोली, राधानगरी यातील पाणीसाठा, विसर्ग याबाबतीतील सर्व माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय जल आयोगालाही नोटीस देण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण बाबतीत केंद्राने तातडीने मदत करण्याच्या प्राथमिक सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती याचिकाकर्ते डॉ. अमोल पवार यांनी दिली आहे.

Intro:अपडेट स्क्रिप्ट आणि व्हिडीओ

mh_sng_01_pur_suprim_court_notice_byt_01_7203751

स्लग - महापूरावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्रासहा महाराष्ट्र,कर्नाटक सरकारने नोटिसा बजावत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले आदेश...

अँकर - सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील
महापुराच्या पार्श्वभूमीवर असून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह,महाराष्ट्र कर्नाटक आणि पूरबाधित जिल्हाप्रशासन व पालिका प्रशासनाला नोटीसा बजावल्या आहेत.तसेच महापुराबाबत आजपर्यंत केलेल्या उपाययोजना व पुनर्वसन कामाबद्दल प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.सांगलीच्या पलूसचे याचिकाकर्ते डॉक्टर अमोल पवार यांनी ही माहिती दिली आहे.
Body:सांगली,सातारा ,कोल्हापूर या सहा कर्नाटक जिल्ह्यामध्ये अनेक गावांना महापूराचा फटका बसून शेकडो लोकांची जीवित आणि त्याचबरोबर लाखो लोकांचे संसार,शेती व्यापार संपूर्ण उध्वस्त झाले आहेत.कोयना,राधानगरी धरणातून करण्यात आलेला विसर्ग,अलमट्टी धरणात अडवलेले पाणी,त्यानंतर अलमट्टी धरणातून करण्यात आलेला विसर्ग यामुळे कर्नाटक मध्ये आलेला महापुर, यामुळे झालेले नुकसान,शासनाकडून पूरग्रस्तांना देण्यात येणारी तुटपुंजी मदत,या सर्व पार्श्वभूमीवर सांगलीच्या पलूस येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात या महापुराच्या बाबतीत जनहित याचिका दाखल केली होती.याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात प्रश्न सुनावणी पार पडली,याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्रसरकार, महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार यांना नोटीस बजावली आहे, व महापुराबाबत आजपर्यंत केलेल्या उपाययोजना व पुनर्वसनबाबत केलेल्या कामाबद्दल प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकारी यांनाही नोटीस बजावली आहे, त्यांना आपापल्या जिल्हयात करीत असलेल्या महापूर पुनर्वसन व मदतीच्या कामाबाबत,सर्व सविस्तर रिपोर्ट प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून मागवण्यात आले आहे.तसेच कर्नाटक सरकारला सांगली, कोल्हापूर महापुराबाबत अलमट्टी कितपत जबाबदार आहे, तसेच महापुरात अलमट्टी धरणांने केलेल्या विविध उपाययोजना याबाबत माहिती मागवली आहे,त्याच बरोबर महापुराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील अलमट्टी, हिप्परगी व महाराष्ट्रातील कोयना, चांदोली, राधानगरी यातील पाणीसाठा, विसर्ग याबाबतितील सर्व माहिती मिळविण्यासाठी केंद्रीय जल अयोगालाही नोटीस देण्यात आली आहे, राष्ट्रीय आपत्ती निवारण बाबतीत केंद्राने तातडीने मदत करण्याच्या प्राथमिक सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती याचिकाकर्ते डॉ अमोल पवार यांनी दिली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.