ETV Bharat / state

सांगली : जतमध्ये दोन तरुणांची आत्महत्या; तर वृद्ध महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू - जतमध्ये वृद्ध महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

जतमध्ये दोन तरुणांची आत्महत्या केली असून एका वृद्ध महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या तिन्ही घटनांची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली आहे.

suicide-of-two-youths-in-jat-in-sangli
सांगली : जतमध्ये दोन तरुणांची आत्महत्या; तर वृद्ध महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू
author img

By

Published : Apr 19, 2021, 10:43 PM IST

सांगली - जत शहरातील एका 23 वर्षीय तरुणाने तर तिप्पेहळी येतील 35 वर्षीय व्यक्तीने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटना सोमवारी दुपारी घडल्या आहेत. तर तालुक्यातील उमराणी येथील एका 80 वर्षीय वृद्धेचा धुणे धुण्यास गेल्यानंतर पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या तिन्ही घटनांची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली आहे.

साडीने गळफास घेऊन आत्महत्या -

जत शहरातील अमोल कुमार जमदाडे (23) रा. मटन मार्केट जत या तरूणाने सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणांनी कुठल्या कारणाने आत्महत्या केली. हे मात्र समजू शकले नाही. जमदाडे याचे बाजार पेठेत दुमजली घर आहे. दुपारी अमोल यांनी वरच्या खोलीत जाऊन कोणाला काही समजायच्या आत साडीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी जत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

तिप्पेहळ्ळीत एकाची नशेत आत्महत्या -

सोमवारी दुपारीच तालुक्यातील तिप्पेहळी येथील 35 वर्षीय अमित अरुण शिंदे या तरुणानेदेखील दारूच्या नशेत आपल्या राहत्या मळ्यात जवळील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अमित यास दारूचे व्यसन होते. परंतु तो कोणत्या नैराश्यात होता, हे समजू शकले नाही. दुपारी घरात कोणी नसल्याचे पाहून नशेतच त्याने दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. बिरनाळ तिप्पेहळी रोडवर त्यांची वस्ती आहे. या घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे.

उमराणीत वृद्धेचा पाण्यात बुडून मृत्यू -

तालुक्यातील उमराणी येथील यमनवा सिद्राम कांबळे (80) वर्षे या महिलेचा गावाशेजारील तलावाच्या पाण्यात पडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास घडली यमनवा कांबळे या नेहमीप्रमाणे तलावात धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांचा तोल घसरून पाण्यात खोल तलावाच्या पाण्यात पडल्या. वयस्कर असल्याने त्यांचा या पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावकऱ्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून घरी आणला. त्यानंतर जत पोलिसांना कळविण्यात आले. या प्रकरणी गुरुनाथ वाघमारे राहणार उमराणी यांनी जत पोलिसांत वर्दी दिली आहे. तपास जत पोलीस करत आहेत.

हेही वाचा - लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहचवण्याची कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.