ETV Bharat / state

व्यवसायातील सततच्या अपयशामुळे जतमधील तरुणाची आत्महत्या - Jat Youth suicide

सिध्दरामेश्वर मल्लय्या स्वामी या तरुणाने शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्यापूर्वी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

सिध्दरामेश्वर मल्लय्या स्वामी
सिध्दरामेश्वर मल्लय्या स्वामी
author img

By

Published : Apr 24, 2021, 10:20 PM IST

जत (सांगली) - जत तालुक्यातील डफळापूरमधील 34 वर्षीय तरुणाने शेतातील घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सिध्दरामेश्वर मल्लय्या स्वामी असे मृत तरुणाचे नाव आहे.

सिध्दरामेश्वर मल्लय्या स्वामी या तरुणाने शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्यापूर्वी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत जत पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल इनामदार यांनी घटनेची नोंद केली आहे.

हेही वाचा-केंद्राकडून कोरोना लशीसह ऑक्सिजन उपकरणांवरील आयात शुल्क माफ

संचारबंदीमुळे व्यवसायात सतत अपयश

सिध्दरामेश्वर स्वामी यांचे गावात पंक्चरचे दुकान होते. संचारबंदी लागू असल्याने अनेक दिवस दुकान बंद आहे. तसेच गेल्या वर्षी शेतीचे उत्पादन घटले. सतत येत असलेल्या अपयशामुळे सिध्दरामेश्वर यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ व त्याची पत्नी असा परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.

हेही वाचा-अजून महादेवराव महाडिक सही सलामत; खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं

चिंता करू नये, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा-

दरम्यान, तणावाचे व्यवस्थापन शक्य नसल्यास मानसिक समुपपदेशन घ्यावे, असा तज्ज्ञ सल्ला देतात. कोरोनामुळे मानसिक आजार वाढले आहेत. यामध्ये स्वतःच्या प्रकृतीविषयी जास्त चिंता व्यक्तीला वाटते. आवश्यक चिंता केल्याने धडधड होणे, मळमळ होणे, आजारी असल्याचा भास होणे असे प्रकार जाणवतात. त्यामुळे यावर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा आजारांची तीव्रता वाढल्यास याचे परिणाम आरोग्यावर जाणवू शकतात, अशी भीती औरंगाबादचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रश्मीन आचलिया यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.