ETV Bharat / state

ठिबक सिंचन योजनांचे अनुदान वाढविण्यासाठी प्रयत्नशील, कृषिमंत्र्यांचे बांधावरून आश्वासन - ठिबक सिंचन अनुदान

राज्यामध्ये शेतीला काही ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, तर काही ठिकाणी अति पाण्यामुळे शेती नापीक होत चालली आहे.या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या माध्यमातून भूमीगत ठिबक सिंचन योजना राबविणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

ठिबक सिंचन योजनांचे अनुदान
ठिबक सिंचन योजनांचे अनुदान
author img

By

Published : Apr 11, 2021, 1:33 PM IST

सांगली - महाराष्ट्राचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी व पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचन योजना राबविणे ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे ठिबक सिंचनाव्दारे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कृषि क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी ठिबक सिंचन योजनांचे अनुदान वाढविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

ठिबक सिंचन योजना काळाची गरज..

वाळवा तालुक्यातील श्री महादेव सहकारी पाणी पुरवठा योजनेला शुक्रवारी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत खासदार धैर्यशील माने, कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबीटकर, महादेव सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषी मंत्री यांनी योजनेची पाहणी करत आढावा घेतला.

यावेळी बोलताना कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, राज्यामध्ये शेतीला काही ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, तर काही ठिकाणी अति पाण्यामुळे शेती नापीक होत चालली आहे.या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या माध्यमातून भूमीगत ठिबक सिंचन योजना राबविणे अत्यंत आवश्यक झाले आहे. ठिबक सिंचन योजनांमुळे जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच भरघोस उत्पन्न वाढीसाठीही उपयोग होतो. त्यामुळे शेती नापिक होत नाही. ठिबक सिंचन योजनांमुळे शेतकऱ्याला मजुराचा खर्च, खतांचा खर्च कमी होण्यास मदत होते. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात जास्तीचे चार पैसे उपलब्ध होतात. पर्यायाने शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होते.

महादेव सहकारी पाणीपुरवठा संस्थेचा प्रकल्प दिशादर्शक

आंध्रप्रदेश या राज्यामध्ये अशा प्रकारच्या योजना राबवून शेतीचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जात आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात ठिबक सिंचन योजना राबविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल. श्री महादेव सहकारी पाणीपुरवठा संस्थेने राबविलेला ठिबक सिंचनाचा प्रकल्प हा राज्यासाठी दिशादर्शक असून याची अंमलबजावणी इतर जिल्ह्यातही करण्यावर भर देण्यात येईल, असा विश्वास मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

शेताच्या बांधावरून कृषी मंत्री ऑनलाईन..

राज्यस्तरीय खरीप हंगाम 2021 नियोजनपूर्व तयारी आढावा बैठक कोल्हापूरमध्ये शुक्रवारी ऑनलाईन पध्दतीने सकाळी सुरू करण्यात आली होती. या बैठकीचा समारोप कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी कृषिरत्न संजीव माने यांच्या शेतात बसून केला. दादाजी भुसे यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन कोल्हापूर येथे सुरू असलेल्या ऑनलाईन खरीप हंगाम आढावा बैठकीत सहभाग घेतला.

या बैठकीत बोलताना भुसे म्हणाले, 'गावपातळीवरून खरीप हंगामाचे नियोजन कसे करता येईल यावर भर देण्यात आला. यावर्षी वेधशाळेने चांगल्या प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवल्याने आगामी काळात खरीपाचे सुयोग्य नियोजन करण्यात येईल आणि त्याची योग्य पध्दतीने अंमलबजावणीही करण्यात येईल. सध्या कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढला असून अनेक ठिकाणी शासन, स्थानिक प्रशासन यांच्या मार्फत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. तथापी,कृषि क्षेत्राला यातून सूट देण्यात आली आहे. कृषि संबधित असलेले बी-बीयाणे, खते यांची दुकाने नियमितपणे सुरू राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी करावी, असे आवाहन करत त्यांनी खरीप हंगाम ऑनलाईन बैठकीचा समारोप केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.