ETV Bharat / state

Subhash Wankhede : काँग्रेसला धक्का; माजी खासदार सुभाष वानखेडे पुन्हा शिवसेनेत - खासदार सुभाष वानखेडे

शिवसेनेकडून ( Shivsena ) तीन वेळेस आमदार आणि एकवेळेस खासदार असलेले सुभाष वानखेडे ( Subhash Wankhede ) यांनी बुधवारी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन ( Shiv bandhan )बांधले आहे.

Subhash Wankhede Joined Shivsena
माजी खासदार सुभाष वानखेडे पुन्हा शिवसेनेत
author img

By

Published : Jul 23, 2022, 3:55 PM IST

नांदेड - शिवसेनेकडून तीन वेळेस आमदार आणि एकवेळेस खासदार असलेल सुभाष वानखेडे यांनी मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात धरला होता. परंतु गेल्या अडीच वर्षांपासून त्यांचे काँग्रेसमध्ये मन रमत नव्हते. त्यात गेल्या काही दिवसात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर उत्तरचे बालाजी कल्याणकर ( Balaji Kalyankar ) पाठोपाठ हिंगोलीचे खासदार हेही शिंदे गटात सहभागी झाल्याने वानखेडेंचा शिवसेना परतीचा मार्ग सुकर झाला होता. तर सुभाष वानखेडे (Subhash Wankhede ) यांनी बुधवारी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन ( Shiv Sena Shiv bandhan ) बांधले.

२०१९ मध्ये हिंगोली लोकसभेची निवडणूक लढविली - हदगावच्या ल्याहरी गावातून सरपंच पदापासून वानखेडे यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतही ते सदस्य होते. त्यानंतर शिवसेनेच्या तिकिटावर हदगाव विधानसभा मतदार संघातून ( Hadgaon Assembly Constituency ) त्यांनी तीन वेळा विजय मिळविला होता. तर २००९ मध्ये हिंगोली लोकसभा मतदार संघात तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचा तब्बल ७५ हजार मतांनी पराभव करीत पहिल्यांदा दिल्ली गाठली होती. २०१४ च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसचे राजीव सातव यांच्याकडून १४०० मतांनी निसटता पराभव झाला होता. पराभवानंतर वानखेडे हे भाजपमध्ये गेले होते. ( Hingoli Lok Sabha Election ) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी २०१९ मध्ये हिंगोली लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी सेनेच्या हेमंत पाटील यांनी त्यांचा तब्बल २ लाख ७७ हजार मतांनी पराभव केला होता. तत्पूर्वी वानखेडे यांनी विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदार संघातून भाजपाचे तिकीट मिळविण्याची तयारी सुरू केली होती. त्यावेळी जवळपास त्यांचे तिकीट निश्चितही झाले होते. तसेच सेनेकडूनही त्यांना ऑफर होती. परंतु पुन्हा ते काँग्रेसच्या गटात गेले होते. तेव्हापासून गेली अडीच वर्षे ते काँग्रेसमध्येच होते.

हदगाव हिमायतनगर मध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले - विधानसभा निवडणुकीत आ. माधवराव जवळगावकर यांच्या विजयात सुभाष वानखेडे यांचा मोलाचा वाटा होता. शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी सुभाष वानखेडेचा शिवसेना पक्ष प्रवेश 2019 च्या लोकसभेला होऊ दिला नाही. असे जाहीर भाषणात लोकसभेचा प्रचारात सांगितले. त्या नंतर विधानसभे मध्ये सुभाष वानखेडे यांनी माधवराव जवळगावकर यांचा प्रचार करून नागेश पाटील आष्टीकरचा पराभव केला. त्या वेळेला नागेश पाटील यांना क्रमांक 3 ची मते घेत फक्त 44 हजार वर समाधान मानव लागले. सुभाष वानखेडे यांनी माधवराव जवळगावकर निवडून आणून हदगाव हिमायतनगर मध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले.

हेही वाचा: MP Hemant Patil Challenge to Opponent : कुणी अंगावर येण्याचा प्रयत्न केल्यास शिंगावर घेण्यास सक्षम - हेमंत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.