ETV Bharat / state

सांगलीत पार पडल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा - राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा सांगली न्यूज

एअर रायफल, एअर पिस्टल, ०.२२ रायफल, १२ बोअर गन, रिव्हॉल्वर/पिस्टल, बिग बोअर रायफल या प्रकारात या स्पर्धा पार पडल्या. यंदाच्या स्पर्धेत महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.

State level rifle shooting competitions held in Sangli
सांगलीत पार पडल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा
author img

By

Published : Mar 3, 2020, 10:33 AM IST

Updated : Mar 3, 2020, 11:01 AM IST

सांगली - राज्यस्तरीय खुल्या रायफल शूटिंग स्पर्धा सांगलीमध्ये पार पडल्या. विविध प्रकारात पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यातील अनेक नेमबाजांनी हजेरी लावली होती.

सांगलीत राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा

हेही वाचा - ...अखेर 'तो' मैदानात उतरला..पाहा व्हिडिओ

स्पर्धेदरम्यान, झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसर दणाणून गेला होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र रायफल शूटींग क्लबच्या वतीने सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातून तब्बल ५५० हून अधिक नेमबाजपटू सहभागी झाले होते.

एअर रायफल, एअर पिस्टल, ०.२२ रायफल, १२ बोअर गन, रिव्हॉल्वर/पिस्टल, बिग बोअर रायफल या प्रकारात या स्पर्धा पार पडल्या. दरवर्षी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या स्पर्धेत महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.

Last Updated : Mar 3, 2020, 11:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.