ETV Bharat / state

'स्मार्ट व्हिलेज योजने'ला आर. आर पाटलांचे नाव' - Sangli District News

दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची पुण्यतिथी आज साजरी होत आहे. त्या निमित्ताने सांगलीच्या तासगाव तालुक्यातील अंजनी येथील आर. आर. पाटील यांच्या मूळ गावी पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आर. आर. पाटील यांना अभिवादन केले.

R R Patil
आर आर पाटील
author img

By

Published : Feb 16, 2020, 4:48 PM IST

सांगली - स्वछता अभियानासाठीच्या 'स्मार्ट व्हिलेज' या योजनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. सांगलीच्या अंजनी येथे आर. आर. आबा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करताना मंत्री मुश्रीफ यांनी याबाबत माहिती दिली.

हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री

आर. आर. पाटील यांची पुण्यतिथी आज साजरी होत आहे. त्या निमित्ताने सांगलीच्या तासगाव तालुक्यातील अंजनी येथील आर. आर. पाटील यांच्या मूळ गावी पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आर. आर. पाटील यांना अभिवादन केले.

हेही वाचा - सांगलीत रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या खड्ड्यात दुचाकी पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू

यावेळी मुश्रीफ यांनी कार्यक्रमात बोलताना दिवंगत आर. आर. पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला. संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियान राबवून, महाराष्ट्र स्वच्छ करण्याचे काम केले आहे. त्यांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानातून आज राज्यात स्मार्ट व्हिलेज नावाने योजना सुरू आहे. या स्मार्ट व्हिलेज योजनेला दिवंगत आर. आर. पाटील यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

याबरोबरच ज्या आर. आर. आबांनी स्वच्छता योजना सुरू केली, त्याला त्यांचेच नाव देणे उचित ठरेल, त्याच बरोबर या योजनेतून देण्यात येणारा बक्षीस समारंभ सोहळा आर. आर. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण राज्यभर पार पाडावा, असा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवणार असल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - शेतकऱ्यांनो आता तरी वीज बील भरू नका.. पाटलांचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.