सांगली - उत्तर प्रदेश येथील चौघा साधूंना जतच्या लवंगा या ठिकाणी झालेल्या मारहाणीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली ( beating of sadhus in Sangli ) आहे. या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत 6 जणांना अटक करण्यात आली ( Six people arrested in case of beating of sadhus ) आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील साधू हल्ल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी रशियाहून डीजीपीशीवर फोनवर बोलून सांगलीच्या घटनेची सविस्तर चौकशी करण्यास सांगितले
साधूंना चोर समजून जमावाने हे बेदम मारहाण जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी उत्तर प्रदेश येथील चार साधूंना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटक मधून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जात असताना लवंगा या ठिकाणी रस्ता विचारण्यासाठी थांबलेल्या साधूंना चोर समजून जमावाने हे बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. मात्र साधुंनी गैरसमजातून हा प्रकार घडल्याचा स्पष्ट करत कोणतीही तक्रार न देता पंढरपूरकडे निघून गेले होते. मात्र या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाल्यानंतर सांगली पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन उमदी पोलीस ठाण्यामध्ये साधूंच्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केले ( case of beating of sadhus in Sangli ) आहे.
-
Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis spoke to DGP on phone from Russia and asked him for a detailed probe in the matter of the Sangli incident where some people attacked Sadhus: Deputy CM's office to ANI
— ANI (@ANI) September 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(File Pic) pic.twitter.com/3FoRve7V2j
">Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis spoke to DGP on phone from Russia and asked him for a detailed probe in the matter of the Sangli incident where some people attacked Sadhus: Deputy CM's office to ANI
— ANI (@ANI) September 14, 2022
(File Pic) pic.twitter.com/3FoRve7V2jMaharashtra Deputy CM Devendra Fadnavis spoke to DGP on phone from Russia and asked him for a detailed probe in the matter of the Sangli incident where some people attacked Sadhus: Deputy CM's office to ANI
— ANI (@ANI) September 14, 2022
(File Pic) pic.twitter.com/3FoRve7V2j
सहा जणांना अटक याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली ( people arrested in case of beating of sadhus ) आहे. आणखी संशयितांचा शोध सुरू असून केवळ गैरसमजूतीतून हा सर्व प्रकार घडल्याचं पोलीस अधीक्षक गेडाम यांनी स्पष्ट केलं आहे.