सांगली - ही साखर कारखान्याची निवडणूक नसून पदवीधरांची आहे,असा टोला पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी भाजप आणि महाविकास आघाडीला लगावला आहे. तसेच या निवडणुकीत काटा मारणाऱ्या साखर सम्राटांचा पदवीधर मतदार काटा काढतील, असा विश्वास कोकाटे यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'साखर कारखान्याची नव्हे तर पदवीधरांची निवडणूक, काटा मारणाऱ्या साखर सम्राटांचा मतदार काढतील काटा' - इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे अपक्ष उमेदवार
ही साखर कारखान्याची निवडणूक नसून पदवीधरांची आहे,असा टोला पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी भाजप आणि महाविकास आघाडीला लगावला आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्रीमंत कोकाटे
सांगली - ही साखर कारखान्याची निवडणूक नसून पदवीधरांची आहे,असा टोला पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी भाजप आणि महाविकास आघाडीला लगावला आहे. तसेच या निवडणुकीत काटा मारणाऱ्या साखर सम्राटांचा पदवीधर मतदार काटा काढतील, असा विश्वास कोकाटे यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुणे पदवीधर निवडणुकीमध्ये इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. आज प्रचारासाठी ते सांगलीमध्ये आले होते. यावेळी कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि महाविकास आघाडी आणि त्यांच्या सांगली जिल्ह्यातील उमेदवारांवर जोरदार निशाणा साधला. भाजपकडून संग्रामसिंह देशमुख आणि महाविकास आघाडीकडून अरुण लाड हे निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही उमेदवारांवर जोरदार टीका केली आहे, ही निवडणूक साखर कारखान्याची नसून ही पदवीधरांची निवडणूक आहे.
काटा मारणाऱ्यांचा काटा काढतील मतदार -
या निवडणुकीत ऊस, एफआरपी, रिकव्हरीअसे प्रश्न नाहीत. याठिकाणी पदवीधरांचे प्रश्न आहेत, मात्र याची कोणतीही जाणीव या दोन्ही उमेदवारांना नाही, असा आरोप कोकाटे यांनी केला आहे. तसेच साखर कारखान्यात ऊसाचा काटा मारणाऱ्या साखर सम्राटांचा या निवडणुकीत पदवीधर काटा काढतील, असा इशाराही यावेळी श्रीमंत कोकाटे यांनी दिला आहे.
अजित पवारांना घाबरतात अरुण लाड -
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्यावर टीका करताना साखर सम्राट असणारे अरुण लाड हे एक तर वयाने खूप मोठे आहेत. त्यामुळे ते पदवीधरांचे प्रश्न काय सोडवतील आणि दूसऱ्या बाजूला ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अरुण लाड हे खूप घाबरतात, अशी टीकाही श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.

Last Updated : Nov 27, 2020, 5:14 PM IST