मुंबई - शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारची कामगिरी जोमात असल्याचे म्हटले आहे. शिवाय सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा विश्वासही त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केला आहे.
प्रभू श्रीरामाची कृपा आहे. सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील असेही त्यांनी म्हटले आहे.
-
सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच!
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
प्रभू श्रीरामाची कृपा.
सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील
">सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच!
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 22, 2020
प्रभू श्रीरामाची कृपा.
सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतीलसरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच!
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 22, 2020
प्रभू श्रीरामाची कृपा.
सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या ५० दिवसांच्या कामकाजावर विरोधी पक्ष भाजपने रविवारी कडाडून टीका केली होती. हे महा‘विकास’ नाही तर महा ‘भकास’ सरकार असल्याचे पोस्टर भाजपच्या वतीने रविवारी सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले होते.
हेही वाचा - 'मुंबई २४ तास' योजनेला मंत्रिमंडळाची मंजूरी - आदित्य ठाकरे