ETV Bharat / state

'ईश्वरपूर'साठी शिवसेनेची इस्लामपूर नगरपालिकेवर धडक - इस्लामपूर नगरपालिका

नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक होत आहे. सांगलीच्या इस्लामपूर शहराचे 'ईश्वरपूर' नामकरण करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेने इस्लामपूर नगरपालिकेवर सोमवारी (दि. 6) धडक मोर्चा काढला होता.

शिवसेनेचा मोर्चा
शिवसेनेचा मोर्चा
author img

By

Published : Dec 7, 2021, 1:51 AM IST

सांगली - नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक होत आहे. सांगलीच्या इस्लामपूर शहराचे 'ईश्वरपूर' नामकरण करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेने इस्लामपूर नगरपालिकेवर सोमवारी (दि. 6) धडक मोर्चा काढला होता. या मागणीचे निवेदन नगराध्यक्षांना दिले आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा शहराच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

धडक मोर्चात सहभागी शिवसैनिक

शहर नामांतरांसाठी शिवसेना आक्रमक ...

राज्यातील शहरांच्या नामांतराचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर येऊ लागला आहे. याबाबत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. सांगलीच्या इस्लामपूर शहराचे 'ईश्वरपूर' नामकरण करण्याची मागणी करत शिवसेनेने इस्लामपूर नगर पालिकेवर धडक दिली. यावेळी वाद्यांच्या गजरात, भगवे फेटे घालून आणि हातात भगवे ध्वज घेऊन मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना नामांतराच्या मागणीचे निवेदन दिले आहे.

बाळासाहेब ठाकरेंनी केले नामकरण ...

1983 मध्ये इस्लामपूर या ठिकाणी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली होती. त्यावेळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर, असे जाहीर केले होते. त्यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर झाले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यातही आता इतर शहरांच्या नामांतराचा मुद्दा शिवसेनेच्या आंदोलनानंतर चर्चेत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा - अवकाळी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू - संजयकाका पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.