ETV Bharat / state

सांगलीतील जनता कर्फ्युला व्यापाऱ्यांसह शिवसेनेचाही विरोध

सांगलीतील कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी 11 सप्टेंबर पासून 10 दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. या जनता कर्फ्युला विरोध व्यापाऱ्यांसह शिवसेनेने विरोध केला आहे. जनता कर्फ्यु पाळणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. शिवसेनेही जनता कर्फ्युला विरोध केला आहे.

sangli corona update
सांगली कोरोना अपडेट
author img

By

Published : Sep 9, 2020, 8:59 PM IST

Updated : Sep 9, 2020, 10:39 PM IST

सांगली- सांगली जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या जनता कर्फ्यूला व्यापारी व शिवसेनासह इतर संघटनांनी विरोध दर्शवला आहे. महापालिकेमधील जनता कर्फ्यूबाबत आयोजित बैठकीमध्ये जनता कर्फ्यू केवळ फार्स ठरेल,त्यातून काहीही साध्य होणार नाही अशी भूमिका मांडत जनता कर्फ्यू पाळण्यास विरोध करण्यात आला आहे.

जनता कर्फ्युला व्यापाऱ्यांचा विरोध

सांगली जिल्ह्यामध्ये दिवसंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. एकूणच जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी सांगलीच्या व्यापारी एकता असोसिएशनसह अनेकांकडून करण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापारी अथवा सामाजिक संघटना,लोकप्रतिनिधी यांना विश्वासात न घेता जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. 11 सप्टेंबर पासून दहा दिवसांसाठी जिल्ह्यातल्या जनतेने स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पार पाडावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी केले आहे.मात्र, या जनता कर्फ्यूला आता विरोध होऊ लागला आहे सांगली महापालिका क्षेत्रातल्या सर्व व्यापारी संघटनांनी जनता कर्फ्यूला विरोध दर्शवला आहे.

सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी आणि पालिका प्रशासनाची जनता कर्फ्यू बाबत बैठक पार पडली त्यामुळे व्यापाऱ्यांनी स्पष्टपणे दुकान बंद ठेवण्यास नकार दर्शवला आहे. कोणत्याही प्रकारची सक्ती जनता कर्फ्यु मध्ये नसल्याने कोणत्याही नागरिकांकडून जनता कर्फ्युचे शंभर टक्के पालन शहरामध्ये होणे अवघड असल्याचे मत बैठकीत मांडण्यात आले.

गेल्या पाच महिन्यात दोन ते अडीच महीने आम्ही बंद पाळून प्रशासनास सहकार्य केले आहे. आता दुकाने बंद ठेवून होणारे नुकसान सोसू शकत नाही. कुटुंबाचा खर्च, कामगारांचे पगार, बॅकांची कर्जे व इतर खर्च आहेत. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात न येण्याचे कारण हे व्यापारी नाहीत. आम्ही शासनाने ज्या गाईडलाइन घालून दिलेल्या आहेत त्यानुसारच व्यवसाय करत आहोत.उलट प्रशासनाने जे काही प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे ते करावेत.त्याकरता समाजातील तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन घ्यावे, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली. जे व्यापारी अथवा नागरिक या गाईडलाइनचे उल्लंघन करून व्यवसाय करत आहेत, त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे.

व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा यांनी देखील जनता कर्फ्यूला विरोध दर्शवला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन सर्व व्यापारी संघटनांनी मिळून १४ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांकडे केली होती.सध्या लॉकडाऊन हाच पर्याय आहे. आतापर्यंत प्रशासनाच्या कोरोना उपाययोजनांमध्ये व्यापाऱ्यांनी नेहमीच पाठिंब्याची भूमिका घेतली मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापारी किंवा अन्य कोणतेही संघटनांना जनता कर्फ्यू बाबत कोणतीही सूचना किंवा पूर्वकल्पना न देता तो जाहीर केला.जनता कर्फ्यू मुळे काहीच होणार नाही, जनता कर्फ्यू हा निष्फळ ठरणार आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात येण्यास कोणत्याही प्रकारची मदत होणार नाही. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचे मात्र नुकसान होणार आहे. त्यामुळे या जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे.

शिवसेनेनेही या जनता कर्फ्यूला विरोध दर्शवला आहे. शिवसेनेचे नेते शेखर माने यांनी जनता कर्फ्यू करणे चुकीचे असून आज संपूर्ण देश अनलॉक च्या दिशेने निघाला आहे, अशा स्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाने कोरोना बाबतीत उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे,अशी भूमिका मांडली. कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड उपलब्ध करणे यासारख्या गोष्टींवर प्रशासनाने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. जनता कर्फ्यू जाहीर करून काही साध्य होणार नाही. जनतेमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याचे माने यांनी सांगितले. प्रशासनाने आज जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल खुली केली पाहिजेत. त्यामुळे जनतेला वेळेत उपचार मिळतील. जनता कर्फ्यू करून काही उपयोग होणार नाही, त्यामुळे शिवसेनेचा या जनता कर्फ्यूला विरोध राहील,अशी भूमिका शिवसेना नेते शेखर माने यांनी स्पष्ट केली आहे.

Last Updated : Sep 9, 2020, 10:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.