ETV Bharat / state

विनाशुल्क परवान्यांसाठी पालिका कार्यालयासमोर शिवसेनेचे बेमुदत उपोषण - sangli shivsena news today

प्रशासनाकडून मागण्यांच्या बाबतीत दुर्लक्ष करण्यात आल्याने भाजीपाला विक्रेते आणि शिवसेना नेत्यांनी पालिकेच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला कालपासून सुरूवात केली आहे.

Shiv Sena
Shiv Sena
author img

By

Published : Dec 22, 2020, 3:59 PM IST

सांगली - फेरीवाले आणि भाजीपाला विक्रेत्यांनी विनाशुल्क परवाने देण्याची मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने सांगली महापालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सोमवारी विविध मागण्यांसाठी पालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. मात्र प्रशासनाकडून मागण्यांच्या बाबतीत दुर्लक्ष करण्यात आल्याने भाजीपाला विक्रेते आणि शिवसेना नेत्यांनी पालिकेच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला कालपासून सुरूवात केली आहे. तसेच या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगली शहरात या भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीपाला विक्री व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिका कार्यालयासमोर ठिय्या करत उपोषण

सांगली महापालिका प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत सांगली महापालिका क्षेत्रातल्या फेरीवाला हातगाडी, भाजी विक्रेत्यांना परवाने व ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र हे परवाने देत असताना पालिका प्रशासनाकडून उपयोग कर, लावून एक हजार रुपये शुल्क घेऊन परवाने देण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. याला शिवसेना आणि जनसेवा फळे, भाजीपाला विक्रेता संघटनेने विरोध दर्शवत नोंदणी झालेल्या फेरीवाले, हातगाडी आणि भाजी विक्रेत्यांना विनाशुल्क परवाने व ओळखपत्र देण्याच्या मागणीसाठी सोमवारी सांगली महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. मात्र मागण्यांच्या बाबतीत पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना आणि जनसेवा फळे, भाजीपाला आणि खाद्य विक्रेते संघटनेकडून महापालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे.

आठवडी बाजार बंद करून पाठिंबा

शिवसेना उपजिल्हा प्रमुख व जनसेवा फळे-भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. तसेच या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगली शहरातील भाजीपाला विक्रेत्यांनी आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर पालिका प्रशासनाने तातडीने नोंदणी झालेल्या विक्रेत्यांना विनाशुल्क परवाने देण्यात यावे, अन्यथा यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.