ETV Bharat / state

शिवसेनेकडून अभिनेत्री कंगना रणौतच्या पोस्टरची गाढवावरुन धिंड

अभिनेत्री कंगना रणौत हिच्या पोस्टरचे शिवसेना व महिला आघाडीकडून गाढवावरुन धिंड काढत तिचे पोस्टर जाळण्यात आले.

आंदोलन करताना शिवसेना
आंदोलन करताना शिवसेना
author img

By

Published : Sep 12, 2020, 10:25 PM IST

सांगली - अभिनेत्री कंगना रणौतच्या पोस्टरची शिवसेनेकडून गाढवावरून धिंड काढण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुंबई पोलिसांचे बदनामी केल्याच्या निषेधार्थ सांगलीच्या मिरजमध्ये शिवसैनिकांनी कंगनाच्या प्रतिकात्मक पोस्टरची गाढवावरून धिंड काढून दहन केले आहे.

अभिनेत्री कंगना रणौतचा निषेध करताना शिवसैनिक

अभिनेत्री कंगना रणौतकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल एकेरी उल्लेख आणि मुंबईची पाकव्याप्त काश्मीर व पाकसह तुलना करण्यात आली होती. त्यांनतर कंगनाकडून वारंवार आक्षेपार्ह विधान करण्यात येत आहेत,असा आरोप करत सांगलीच्या मिरजमध्ये शिवसैनिकांकडून अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात आक्रमक आंदोलन करण्यात आले आहे.

मिरज शहरातून कंगनाच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढण्यात आली आहे. तसेच यावेळी संतप्त शिवसैनिकांनी कंगनाच्या पोस्टरला जोडे मारत कंगना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर यावेळी कंगनाच्या पोस्टरचे दहन करत शिवसैनिकांनी कंगना रनौतचा निषेध नोंदवला. महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री यांच्या विरोधातील बदनामी, यापुढे शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा - कोरोनामुळे 'नागवेली' धोक्यात, दरात 80 टक्क्यांची घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.