सांगली - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ याठिकाणी आणलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेण्यात आले. तर त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठानकडून आयोजित निषेध सभा मात्र पोलीस परवानगी नसल्याने रद्द करण्यात आली.
शिवप्रतिष्ठानकडून पुरंदरेंना श्रद्धांजली..
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पुणे या ठिकाणी निधन झालं आहे. त्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांचे अस्थिकलश सांगली मध्ये शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून आणण्यात आला होता. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे अस्थी कलश दर्शनासाठी ठेवण्यात आले. सांगली जिल्ह्यामध्ये त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू असल्याने मोजक्याच धारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत शिवप्रतिष्ठानच्या वतीने बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बाबासाहेब पुरंदरेंना शिवप्रतिष्ठानकडून श्रद्धांजली तर संभाजी भिडेंच्या उपस्थितीत होणारी निषेध सभा रद्द - बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ याठिकाणी आणलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेण्यात आले.