ETV Bharat / state

नव्या पिढीने एकत्र येऊन अण्णाभाऊंचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज - शरद पवार

author img

By

Published : Aug 1, 2019, 9:47 PM IST

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची गुरुवारी 99 वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने जन्मशताब्दी वर्ष समारंभाचे सांगलीच्या वाटेगाव या आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार, राष्ट्रवादीचे मुंबईचे आमदार जितेंद्र आव्हाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी आदी उपस्थित होते.

शरद पवार

सांगली - समाजात आज दुही निर्माण करण्याचे काम सुरू असून नव्या पिढीने एकत्र येऊन अण्णाभाऊ साठे यांच्या समता आणि ऐक्याचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. सांगलीच्या वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते.

यावेळी सर्वांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. तसेच शरद पवार यांच्या हस्ते विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना साहित्यरत्न जन्मभूमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना अनेक देशातील सध्यस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.

आज समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारात भिन्नता असल्याचा अपप्रचार करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. त्यामुळे आज नव्या पिढीने एकत्र येण्याची गरज असून सुदैवाने आज अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे याबाबत काम करण्यासाठी पुढे येत आहेत. त्याच्या आवाहनानुसार नव्या पिढीने अण्णाभाऊ साठेंचे समता आणि ऐक्याचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

avb

feed send file name - mh_sng_05_sathe_jayanti_on_pawar_vis_1_7203751 - to -
mh_sng_05_sathe_jayanti_on_pawar_byt_3_7203751

स्लग - नव्या पिढीने एकत्र येऊन अण्णाभाऊंचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार..

अँकर - समाजात आज दुही निर्माण करण्याचे काम सुरू असून नव्या पिढीने एकत्र येऊन अण्णाभाऊ साठे यांच्या समता,ऐक्याचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. सांगलीच्या वाटेगाव मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते.

Body:व्ही वो - साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची आज 99 वी जयंती साजरी होत आहे,यानिमित्ताने जन्मशताब्दी वर्ष समारंभाचे सांगलीच्या वाटेगाव या आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार ,राष्ट्रवादीचे मुंबईचे आमदार जितेंद्र आव्हाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते,यावेळी मान्यवरांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.तर यानिमित्ताने शरद पवारांच्या हस्ते विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड साहित्यरत्न जन्मभूमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी अनेक मान्यवरांनी बोलताना देशातील सध्याच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली.तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बोलताना आज समाजामध्ये समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे,तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारात भिन्नता असल्याचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्यामुळे आज नव्या पिढीने एकत्र येण्याची गरज असून सुदैवाने आज अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे याबाबत काम करण्यासाठी पुढे येत आहेत. आणि त्याच्या आव्हाना नुसार नव्या पिढीने अण्णाभाऊ साठेंचे समता आणि ऐक्याच्या विचार पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.