ETV Bharat / state

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्ठे यांचे निधन; सांगलीत घेतला अखेरचा श्वास - sangli freedom fighters news

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सांगली जेल फोडो आंदोलनातील शेवटचे शिलेदार जयराम कुष्ठे यांचे रविवारी निधन झाले. ते 102 वर्षाचे होते. सांगलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणजोत मालवली.

जयराम कुष्ठे
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्ठे यांचे निधन; सांगलीत घेतला अखेरचा श्वास
author img

By

Published : Aug 24, 2020, 9:41 AM IST

सांगली - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सांगली जेल फोडो आंदोलनातील शेवटचे शिलेदार जयराम कुष्ठे यांचे रविवारी निधन झाले. ते 102 वर्षाचे होते. सांगलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

यामुळे सांगलीतील स्वातंत्र्य सैनिकांच्या माळेतील एका हिरा निखळून पडला आहे. कुष्ठे हे मूळचे कोकणातील राजापूर तालुक्यातील जुना कोळवण गावचे सुपुत्र होते. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागासाठी सांगली जिल्ह्यात ते स्थायिक झाले होते. जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथआण्णा नायकवडी, जी.डी. लाड, वसंतदादा पाटील, हुतात्मा किसन अहिर, नामदेवराव कराडकर यांसह अनेक स्वातंत्र्य सैनिकांशी त्यांचा संपर्क आला होता.

24 जुलै 1943 रोजी सांगलीत 'जेल फोडो' घटना घडली होती. यावेळी एकूण बारा स्वातंत्र्यसैनिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. यामध्ये जयराम कुष्ठे यांचाही सहभाग होता. या घटनेत आण्णासाहेब पत्रावळे आणि बबनराव जाधव हे स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात शहीद झाले. जयराम कुष्टे यांच्यासह बाकी अन्य दहा जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

जयराम कुष्ठे यांनी स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. याची माहिती ब्रिटिश पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांच्या मागावर पोलीस होते. यामुळे त्यांना भूमिगत व्हावे लागले.

ब्रिटिश सरकारने जयराम कुष्ठे यांच्यावर त्या काळात मोठे बक्षीस सुद्धा जाहीर केले होते. मात्र ते 12 वर्ष भूमिगत राहिले. या दरम्यान ते सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील शंकरराव मोहिते-पाटील यांच्या वाड्यात वास्तव्यास होते. कुष्ठे हे सांगली, सातारा, कोल्हापूर सोलापूर या चार जिल्ह्यांमधील ब्रिटिश विरोधी आंदोलनात अग्रभागी होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य सैनिक असलेले जयराम कुष्ठे हे सांगलीत स्थायिक झाले होते.

रविवारी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी राष्ट्र सेवा दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, पणतू असा परिवार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.