ETV Bharat / state

महापुरामुळे सांगलीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ - latest news about sangali

सांगली शहरातल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी, वणवण भटकण्याची वेळ आली आहे. शहरात काही ठिकाणी वॉटर एटीएम आहेत. पण तिथे पाणी विकत घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ
author img

By

Published : Aug 8, 2019, 2:20 PM IST

Updated : Aug 8, 2019, 3:42 PM IST

सांगली - शहराला महापुराचा विळखा पडलेला आहे. यामुळे सांगलीत जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जीवनावश्यक वस्तूंवर याचा परिणाम झाला आहे. पाणी, दूध, भाजीपाला आणि सिलेंडर यांचा मोठा तुटवडा निर्माण होत असल्याने सामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ

सांगली आणि कुपवाड शहरातील पाणीपुरवठा मागील तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे सांगली शहरातल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी, वणवण भटकण्याची वेळ आली आहे. शहरात काही ठिकाणी वॉटर एटीएम आहेत. पण तिथे पाणी विकत घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. यामुळे पिण्याचे पाणी प्रशासनाने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

मागील दोन दिवसांपासून शहरातला दूध पुरवठा विस्कळीत झाला आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात दूध, भाजीपाला आणि सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. दूध 70 रुपये लिटर तर भाजीपाला महाग दराने विकला जात आहे. तर बँकांची ATM सेवाही बंद पडली आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र सद्या सांगलीत पाहण्यास मिळत आहे.

सरफराज सनदी

Feed send  - desk whatsapp

स्लग - महापुरामुळे सांगलीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा,पाणी विकत घेण्याची नागरिकांच्यावर वेळ..

अँकर - सांगली शहराला महापुराचा विळखा पडलेला आहे.त्यामुळे सांगलीत जनजीवन विस्कळीत झालं आहे.अनेक जीवनावश्यक वस्तूंवर याचा परिणाम झालाय पाणी, दूध,भाजीपाला आणि सिलेंडर यांचा मोठा तुटवडा होत असल्याने सामान्य नागरिकांना,मोठे हाल सहन करावे लागत आहेत,सांगली आणि कुपवाड शहरातला पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे.त्यामुळे सांगली शहरातल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी, वणवण भटकण्याची वेळ आली आहे. शहरातली जी काही वॉटर एटीएम आहेत.तिथे पाणी विकत घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे.स्थानिक नागरिकांच्या कडून पिण्याचे पाणी प्रशासनाने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे.
शहरातला दूध पुरवठा विस्कळीत झाला आहे,मोठ्या प्रमाणात दुधा,भाजीपाला  आणि सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे.दूध 70 तर भाजीपाला महाग दराने विकला जात आहे.तर बँकांचे सर्व ATM सेवाही बंद पडली आहे.यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.
यासर्वाचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला आहे,सांगली ईटीव्ही भारत प्रतिनिधी यांनी.
Last Updated : Aug 8, 2019, 3:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.