सांगली - लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे संजयकाका पाटील हे पुन्हा निवडून आले आहेत. १ लाख ६४ हजार इतक्या मत्ताधिक्यांनी पाटील यांचा विजय झाला आहे. तिरंगी लढत होऊनही संजय पाटलांनी मिळवलेला दणदणीत विजय जिल्ह्यातील आगामी विधानसभेचा कल स्पष्ट करणारा आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघात संजय पाटलांना किती मतांची आघाडी मिळाली.
सांगली लोकसभेच्या मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातील भाजपचे असणारे प्राबल्य आणि इतर कारणामुळे संजय पाटील यांचा विजय झाला आहे. या लोकसभा मतदार संघातील ६ मतदार संघापैकी ४ मतदारसंघात भाजपचे ३ आणि सेनेचे १ आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात सहाजिकचे संजय पाटील यांना आघाडी मिळणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे पाटील यांना आघाडी मिळाली आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील अपवाद वगळता पाचही विधानसभा मतदारसंघात पाटील यांना कमी-अधिक प्रमाणात आघाडी मिळाली आहे.
सांगली- विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुधीर गाडगीळ हे आमदार आहेत. तर या मतदारसंघात असणाऱ्या महापालिकेत नुकतेची भाजपची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे पाटलांना चांगली आघाडी मिळाली आहे.
संजयकाका पाटील, भाजप - ९२ हजार ५४१, विशाल पाटील - स्वाभिमानी शेतकरी पक्ष ७१ हजारह ७०९, गोपीचंद पडळकर - वंचित बहुजन आघाडी ३२ हजार ७८०, - संजय काका यांना मिळालेली आघाडी - २० हजरा ८३२.
मिरज - मतदारसंघात भाजपचे सुरेश खाडे हे आमदार आहेत. तर महापालिकेत या शहराचा समावेश असल्याने भाजप नगरसेवकाचे प्राबल्य आहे.
संजयकाका पाटील -भाजप, ९१ हजार ४४, विशाल पाटील - स्वाभिमानी पक्ष - ७३ हजार ५५०, गोपीचंद पडळकर - वंचित बहुजन आघाडी ३८ हजार ५०६ - संजयकाका पाटील यांना मिळालेली आघाडी - १७ हजरा ४३०
तासगाव-कवठेमहांकाळ-खरं, तर संजय पाटील यांचा हा स्थानिक मतदार संघ, मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन आर आर पाटील या आमदार आहेत. त्यामुळे अत्यंत चुरशीने या मतदारसंघात मतदान झाले होते.
संजय पाटील - भाजप ९४ हजरा ९९२, विशाल पाटील स्वाभिमानी पक्ष - ४८ हजार ४३, गोपीचंद पडळकर - वंचित बहुजन आघाडी ५४ हजार ७८७, - संजयकाका पाटील यांना मिळालेली आघाडी - ४६ हजरा ४९४
खानापूर - या मतदार संघात शिवसेनेचे अनिल बाबर हे आमदार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा हा स्थानिक मतदार संघ असल्याने याठिकाणी चुरशीने मतदान पार पडले, ज्यामुळे संजया पाटील यांना अत्यंत कमी मत्ताधिक्क कमी मिळाले आहे.
संजयकाका पाटील - भाजप, ७९ हजरा १७९, गोपीचंद पडळकर - वंचित बहुजन आघाडी -७८ हजरा २४, विशाल पाटील - स्वाभिमानी पक्ष ४३ हजरा ८२९ - संजयकाका पाटील यांना एक हजार १५५ इतक्या मतांची आघाडी मिळाली.
पलूस -कडेगाव - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांचा मतदार संघ, याठिकाणी त्यांचे सुपुत्र विश्वजित कदम हे काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून वसंतदादा घराणे आणि विश्वजीत कदम यांच्यात जोरदार संघर्ष झाला होता. मात्र अंतिमत: समझोता होऊन कदम यांनी विशाल पाटलांचे जोरदार काम केल्याने एकमेव या मतदारसंघात विशाला पाटलांना मताधिक्य मिळाले.
संजयकाका पाटील भाजप - ६७ हजरा ८०९, विशाल पाटील - स्वाभिमानी पक्ष ७३ हजरा ११७, गोपीचंद पडळकर - वंचित बहुजन आघाडी ४० हजरा १६९, स्वाभिमानीचे विशाल पाटील यांना याठिकाणी ५ हजरा ३०८ मतांची आघाडी मिळाली.
जत मतदारसंघात भाजपचे विलासराव जगताप हे आमदार आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि दुष्काळी तालुका म्हणून या मतदार संघाची ओळख आहे.
संजयकाका पाटील भाजप ७८ हजरा ५०, गोपीचंद पडळकर ५३ हजरा ८३, विशाल पाटील ३१ हजार ७६८- संजयकाका पाटील यांनी मिळालेली आघाडी - २४ हजार ९६७
पलूस -कडेगाव वगळता सर्व अपेक्षात मतदार संघात भाजपचे संजय पाटील यांना कमी-अधिक प्रमाणात मतांची आघाडी मिळाली आहे. वास्तविक गेल्या ५ वर्षात संजय पाटील आणि भाजपच्या स्थानिक आमदार आणि नेत्यांमध्ये अनेकवेळा संघर्ष निर्माण झाला होता. त्यामुळे आमदार आणि नेते, संजय पाटील यांच्यावर नाराज होते. त्याचे परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांची नाराजी दूर करत संजय पाटील यांच्या दिलजमाई करत संजय पाटील यांना विजय करण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे सर्वच नेत्यांनी आणि आमदारांनी आपली नाराजी बाजूला ठेवत ताकतीने काम केले, भाजपच्या विद्यमान आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात संजय पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे. या मतदारसंघात पाटील यांना मिळालेल्या मतांची आघाडी पाहता, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा यश संपादन करून आपले गड शाबूत ठेवण्यात काहीच अडचण ठरणार नसल्याची शक्यता नाकारता येत नाही.