ETV Bharat / state

संजयकाका पाटील विरुद्ध विशाल पाटील लढतीचे "या" नेत्याने दिले होते संकेत. .

author img

By

Published : Apr 1, 2019, 9:11 AM IST

Updated : Apr 1, 2019, 3:11 PM IST

दिलीप पाटलांनी लोकसभेच्या मैदानात विशाल पाटील आणि संजय पाटील यांची लढत होईल, असे स्पष्ट संकेत दिले होते. यावेळी उपस्थित सर्वांनी हासण्यावारी नेले होते. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विशाल पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

बोलताना दिलीप पाटील

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विशाल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून संजयकाका पाटील यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. मात्र या दोघांमध्ये लढत होण्याचे संकेत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दोन महिन्याआधीच दिले होते. ते आता खरे ठरले आहेत.

बोलताना दिलीप पाटील

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका कार्यक्रमात दिलीप पाटलांनी लोकसभेच्या मैदानात विशाल पाटील आणि संजय पाटील यांची लढत होईल, असे स्पष्ट संकेत दिले होते. यावेळी उपस्थित सर्वांनी हासण्यावारी नेले होते.
मात्र निवडणुका जवळ आल्यावर आणि जाहीर झाल्यानंतरही सांगली काँग्रेसचा उमेदवार कोण हे निश्चित करण्यात नव्हते. त्यामुळे गेल्या महिन्याभरात सांगली लोकसभेच्या मैदानात भाजपच्या संजयकाका पाटील यांच्या समोर उमेदवार कोण ? असा प्रश्न पडला होता. काँग्रेसमधून प्रतीक पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील अशा दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत होती. पण विशाल पाटलांनी सुरवातीस सांगली लोकसभा ऐवजी विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याने, त्यांची शक्यता कमी होती.

निवडणुका जाहीर झाल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आणि काँग्रेसची जागा महाआघाडीचे मित्र पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेली. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे सांगलीच्या मैदानात लढू शकेल असा तगडा उमेदवार नव्हता. सांगलीच्या काँग्रेसची जागा वसंतदादा घराण्यातून बाहेर गेल्याने विशाल पाटलांनी बंड केले होते. मात्र विशाल पाटील या निवडणुकीत अपक्ष लढणार की या निवडणुकीतून माघार घेणार अशी चर्चा जोरदार सुरू होती. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गोपीचंद पडळकर त्याचबरोबर विशाल पाटील यांनाही उमेदवारीबाबत विचारण्यात आले होते. अखेर या सर्व घडामोडींवर पडदा पडत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विशाल पाटलांना सांगली लोकसभेच्या मैदानात उतरवले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याविरोधात विशाल पाटील आपले तगडे उमेदवार असल्याचे स्पष्ट केले. लोकसभेच्या आखाड्यात संजयकाका पाटील यांच्या विरोधात कोण यावर अखेर पडदा पडला.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत खासदार संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला होता. यावेळी दिलीप पाटील यांनी बोलताना संजयकाका पाटील यांचे भाषण आज खूप चांगले झाले, त्यांनी 'त्यांच्या समोर उभे राहणाऱ्या विशाल पाटील' यांना आज व्यवस्थित केले आहे, असा मिश्किल टोला लगावला होता. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. मात्र त्यावेळी कोणी संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्यात लोकसभेची लढत होईल, याकडे फार गंभीर घेतले नाही. मात्र पाटील यांचे विधान त्यावेळी खरे होते. त्यामुळे दोन महिने आधीच दिलीप पाटील यांनी व्यक्त केलेला राजकीय अंदाज अचूक होता. विशाल पाटलांच्या उमेदवारीमुळे तो स्पष्ट झाला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Avb

Feed send - file name -
R_MH_1_SNG_31_MARCH_2019_DILIP_PATIL_VIDHAN_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_3_SNG_31_MARCH_2019_DILIP_PATIL_VIDHAN_SARFARAJ_SANADI.mp4

स्लग - संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील लढतीच दोन महिने आधीच "या" नेत्याने केले होते स्पष्ट..

अँकर - संजयकाका पाटील विरुद्ध विशाल पाटील अश्या लढतीच दोन महिन्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी स्पष्ट संकेत दिले होते.
जाहीर सभेत दिलीप पाटील यांनी संजयकाका पाटील यांच्या समोर विशाल पाटील उभे राहणार असे केलेले विधान अखेर आज खरं ठरलं आहे.Body:व्ही वो - सांगलीच्या लोकसभेची लढत संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्यात फिक्स झाली आहे.
स्वाभिमानी कडून अनेक राजकीय घडामोडींत विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.मात्र दोन महिने आधीच राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा मध्यवर्तीचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका कार्यक्रमात दिलीप पाटलांनी लोकसभेचे मैदानात विशाल पाटील आणि संजय पाटील यांची लढत होईल असे स्पष्ट संकेत दिले होते.यावेळी उपस्थित सर्वांनी हासण्यावारी नेले होते.
मात्र निवडणुका जवळ आल्यावर आणि जाहीर झाल्यानंतरही सांगली काँग्रेसचा उमेदवार कोण हे काँग्रेस कडून निश्चित करण्यात नव्हतं,त्यामुळे गेल्या महिन्याभरात सांगली लोकसभेच्या मैदानात भाजपाच्या संजयकाका पाटील यांच्या समोर उमेदवार कोण ? असा प्रश्न पडला होता,काँग्रेस मधून प्रतीक पाटील,
विश्वजित कदम,विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील अश्या दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत होती.पण विशाल पाटलांनी सुरवातीस सांगली लोकसभा ऐवजी विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याने,त्यांची शक्यता कमी होती.मात्र निवडणूका जाहीर झाल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या,आणि ज्यात हक्काची काँग्रेसची जागा महाआघाडीचे मित्र पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेली.मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे सांगलीच्या मैदानात लढू शकेल असा तगडा उमेदवार नव्हता, आणि सांगलीच्या काँग्रेसची जागा वसंतदादा घराण्यातुन बाहेर गेल्याने विशाल पाटलांनी बंड केला होता.मात्र विशाल पाटील या निवडणुकीत अपक्ष लढणार का की या निवडणुकीतून माघार घेणार अशी चर्चा जोरदार सुरू होते तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गोपीचंद पडळकर त्याचबरोबर विशाल पाटील यांनाही उमेदवारीबाबत घालण्यात आला होता. आणि अखेर या सर्व घडामोडींवर पडदा पडत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वसंताच्या घराण्यातच पुन्हा उमेदवारी देऊ करत विशाल पाटलांना सांगली लोकसभेच्या मैदानात उतरवले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर करत भाजपाचे खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात विशाल पाटील आपले तगडे उमेदवार असल्याचे स्पष्ट केले.आणि लोकसभेच्या आखाड्यात संजयकाका पाटील यांच्या विरोधात कोण यावर अखेर पडदा पडला.मात्र २ महिन्या आधी राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगली लोकसभेचे स्पष्ट संकेत दिले होते.जिल्हा मध्यवर्ती बँकेत खासदार संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्या उपस्थिती एक कार्यक्रम पार पडला होता.आणि यावेळी दिलीप पाटील यांनी बोलताना
संजयकाका पाटील यांचे भाषण आज खूप चांगले झाले,त्यांनी 'त्यांच्या समोर उभे राहणाऱ्या विशाल पाटील' यांना आज व्यवस्थित केले आहे,असं मिश्किल टोला लागवाल होता.यावर उपस्थितांच्या मध्ये एकच हशा पिकली होती.मात्र त्यावेळी कोणी संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्यात लोकसभेची लढत होईल,याकडे
फार गंभीर घेतले नाही.मात्र पाटील यांचे विधान त्यावेळी खरं होतं,त्यामुळे दोन दोन महिने आधीच दिलीप पाटील यांनी
व्यक्त केलेले राजकीय अंदाज अचूक होता,आणि विशाल पाटलांच्या उमेदवारी मुळे तो स्पष्ट झाला आहे.

बाईट - दिलीप पाटील - अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक ,सांगली.( दोन महिन्या आधी केलेले विधान ) Conclusion:
Last Updated : Apr 1, 2019, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.