ETV Bharat / state

जिल्हा परिषदेचे प्रभारी 'सीईओ' गुडेवारांची बदली, दुडी यांची नियुक्ती - सीईओ चंद्रकांत गुडेवार बातमी

सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदी जितेंद्र दुडी यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे मागील महिन्यापासून सत्ताधारी भाजपा आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ चंद्रकांत गुडेवार यांच्यात सुरू असलेले सुप्त संघर्ष थांबला आहे.

sangli ZP
सांगली जिल्हा परिषद इमारत
author img

By

Published : Jul 12, 2020, 2:53 AM IST

सांगली - सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदी जितेंद्र दुडी यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे मागील महिन्यापासून सत्ताधारी भाजपा आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ चंद्रकांत गुडेवार यांच्यात सुरू असलेले सुप्त संघर्ष थांबला आहे. भाजपा आमदारांनी प्रभारी सीईओ गुडेवारांच्या बदलीची मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती.

सांगली जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची मागील महिन्यात जळगाव येथे बदली झाली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाराचा पदभार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. "यंत्रणेतील गॅंगरीन कापून फेकून देणे" हे माझे काम आहे ,अशी भूमिका स्पष्ट करत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कारभार हाती घेत गुडेवार यांनी कारवाईचा धडाका सुरू केला होता.

प्रभारी सीईओ गुडेवार यांनी नळ पाणी योजनांची चौकशी सुरू केली होती. काम वाटपातील शिफारशी फंड बंद पाडला होता, शिवाय निविदामधील काही अटी रद्द केल्या होत्या. तसेच प्राशसनातील राजकीय हस्तक्षेपावर गुडेवार यांनी अंकुश लावला होता. यामुळे गुडेवार यांच्यावर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य नाराज होते.

तर काही दिवसांपूर्वी अनियमितता आणि ठपके असल्याने एक शाखा अभियंता याला सेवेतून बडतर्फ तर एक शिक्षक व दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेचे प्राशसन आणि सत्ताधारी भाजपा हादरून गेले होते.

त्यानंतर सांगलीचे भाजपा आमदार सुधीर गाडगीळ आणि मिरजचे भाजपा आमदार सुरेश खाडे यांनी गुडेवार यांच्या बदलीच्या मागणीचे पत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे दिल्याचे समोर आले होते.

त्यामुळे भाजपा आमदारांवर टीकेची झोड उठली होती. तर यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रभारी सीईओ गुडेवार यांचे समर्थन करत आंदोलनाचा इशारा दिला होता.

चंद्रकांत गुडेवार यांची डिसेंबर, 2019 मध्ये सांगली जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून गुडेवार यांची ओळख असून अकोला याठिकाणी असताना गुडेवार यांनी बंधाऱ्यातील भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणत दोषी अधिकारी आणि कर्मचारयांवर कारवाई केली होती. तर राजकीय हस्तक्षेप झुगारून काम करण्याचे भूमिकेमुळे त्यांना अनेक वेळा बदलीला सामोरे जावे लागले आहे.

चंद्रकांत गुडेवार यांच्या विरुद्ध विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. विधानसभेच्या न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना समज देण्यात आली होती. तसेच भविष्यात चंद्रकांत गुडेवार यांना कोणत्याही कार्यकारी पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये, असे विधानसभा हक्कभंग समितीने सांगितले होते. चंद्रकांत गुडेवार यांना कार्यकारी पदावर नियुक्ती देता येत नसल्याने त्यांना सांगलीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती देण्यात आली होती.

आता सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पुणे जिल्ह्यातील घोडगाव अदिवासी प्रकल्प सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे प्रशासकीय अधिकारी जितेंद्र दुडी यांच्या नियुक्तीनंतर गुडेवार यांची बदली होणार की ते अतिरिक्त सीईओ म्हणून सांगली जिल्हा परिषदेत कार्यरत राहणार हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'त्या' पदाधिकाऱ्याच्या खुनाचा अवघ्या 24 तासात छडा; 5 आरोपी अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.