ETV Bharat / state

महापुरानंतर सांगलीची एसटी सेवा पूर्ववत; आगाराला 3 कोटींचा फटका - सांगली पूर

आठ दिवस पाण्यात असणारे बसस्थानक बुधवारी पुन्हा पूर्ववत झाले आहे. या महापुरात सांगली एसटी विभागाला जवळपास 3 कोटींचा फटका बसला आहे. पूराचे पाणी ओसरल्यामुळे ही एसटी सेवा पुन्हा सुरू झाली आहे.

महापुरानंतर सांगलीची एसटी सेवा पूर्ववत
author img

By

Published : Aug 14, 2019, 10:29 PM IST

सांगली - महापुराचे पाणी ओसरल्यानंतर सांगलीची एसटी सेवा पूर्ववत झाली आहे. कृष्णा नदीला आलेल्या महापुरात सांगलीचे एसटी बसस्थानकही बुडाले होते. आठ दिवस पाण्यात असणारे बसस्थानक बुधवारी पुन्हा पूर्ववत झाले आहे. दरम्यान या महापुरामुळे सांगली एसटी आगाराला सुमारे ३ कोटींचा फटका बसला आहे.

महापुरानंतर सांगलीची एसटी सेवा पूर्ववत

सांगली आगाराची एसटी सेवा सर्व मार्गावर पुन्हा धावू लागली आहे. मात्र, या महापुरात सांगली एसटी विभागाला जवळपास 3 कोटींचा फटका बसला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याची कल्पना येताच याठिकाणी असणाऱ्या एसटी बस वेळेत मिरज आगारात हलविण्यात आल्या होत्या. त्यामुळे बस गाड्यांचे मोठे नुकसान टळले आहे. मात्र, सांगली एसटी आगाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे. रोजच्या जवळपास 1 हजार फेऱ्या गेल्या आठ दिवस बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांचेही हाल झाले आहेत. शिवाय उत्पन्न ही बुडाले आहे. पूराचे पाणी ओसरल्यामुळे ही एसटी सेवा पुन्हा सुरू झाली आहे. याबाबत सांगली एसटी विभागाच्या प्रमुख अमृता ताम्हणकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनी बातचीत केली.

Intro:सरफराज सनदी

file name - mh_sng_05_st_on_sangli_flood_7203751 -

स्लग - महापुरात बुडालेली सांगली एसटी पूर्ववत,तब्बल 3 कोटींचा फटका...

अँकर - कृष्णा नदीच्या महापुरात सांगली एसटी बसस्थानकही बुडाले होते,आठ दिवस पाण्यात असणारे एसटी आगार आज पुन्हा पूर्ववत झालं आहे.सर्व मार्गावर आज एसटी पुन्हा धावू लागली आहे.मात्र या महापुरात सांगली एसटी विभागाला जवळपास 3 कोटींचा फटका बसला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याची कल्पना आल्याने याठिकाणी असणाऱ्या एसटी बस वेळात हलवण्यात आल्या.त्यामुळे मोठे नुकसान टळले आहे.मात्र तरीही सांगली एसटी आगाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे, रोजच्या जवळपास 1 हजार फेऱ्या गेल्या आठ दिवस बंद होत्या,त्यामुळे प्रवाशांचेही मोठे हाल झाले आहेत,आता ही एसटी सेवा पुन्हा सुरू झाली आहे.याबाबत सांगली एसटी विभागाच्या प्रमुख अमृता ताम्हणकर यांच्याशी बातचीत केली आहे.
सांगलीचे ईटीव्ही भारत प्रतिनिधी यांनी ...

Body:.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.