ETV Bharat / state

पोलिसांचे थोबाड काळे झाले बोलणाऱ्या फडणवीसांचे तोंड काळे करू - शिवसेना - sangli latest news

महाराष्ट्र पोलिसांचे थोबाड काळे झाले म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं तोंड काळ करू,असा इशारा सांगलीच्या शिवसैनिकांनी दिला आहे.

Sangli Shiv Sena protest
सांगलीत शिवसेनेचे आंदोलन
author img

By

Published : Mar 10, 2021, 4:55 PM IST

Updated : Mar 10, 2021, 5:04 PM IST

सांगली - महाराष्ट्र पोलिसांचे थोबाड काळे झाले म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं तोंड काळ करू,असा इशारा सांगलीच्या शिवसैनिकांनी दिला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या बाबतीत केलेल्या विधानाचा निषेध म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सांगलीमध्ये निदर्शने करत शिवसेनेने हा इशारा दिला आहे.

शिवसेना नेते डॉ. महेशकुमार कांबळे

हेही वाचा - सरकारने दिलेल्या जमिनीवर रामदेव बाबासह अंबानी कधी उद्योग उभे करणार?

देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आंदोलन

अनव्य नाईक आत्महत्या प्रकरणी भाजपचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना कोर्टाच्या निकालानंतर मुंबई पोलिसांचे थोबाड काळे झाले, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. शिवसेनेने महाराष्ट्र पोलिसांचे खच्चीकरण आणि बदनामी करणारे विधान केल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सांगलीमध्ये शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे.

हेही वाचा - 'खुन्यांना पाठीशी घालणारं सरकार सचिन वाझेंना पुरावे नष्ट करण्याची संधी देतंय का?'

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. फडणवीस हे गृहमंत्री असताना संपूर्ण जगाला मुंबई, महाराष्ट्र पोलीस एक नंबर असल्याचं वारंवार सांगत होते, आता सत्ता गेल्याने त्याचा पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अन्यथा फडणवीसांच्या तोंडाला काळे फासू

तसेच विधानसभेत सर्वसामान्यांच्या वर होणाऱ्या अत्याचारावर आवाज उठवणे ऐवजी अंबानींच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या सापडल्या म्हणून गदारोळ करत आहेत, ते विरोधी पक्षनेते आहेत की, अंबानीचे दलाल आहेत का? असा सवाल शिवसेना नेते डॉ.महेशकुमार कांबळे यांनी केला आहे. तसेच पोलिसांबद्दल थोबाड काळे झाल्याची भाषा करणारे देवेंद्र फडणवीस हे सांगली दौऱ्यावर आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा यावेळी डॉ. महेशकुमार कांबळे व चंद्रकांत मैंगुर यांनी दिला आहे.

हेही वाचा - पीफ्फ : कोरोनामुळे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लांबणीवर

Last Updated : Mar 10, 2021, 5:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.