ETV Bharat / state

अखेर पुन्हा वाजली शाळेची घंटा..! पहिल्या दिवशी विद्यार्थी अन् शिक्षकांमध्ये उत्साह

author img

By

Published : Nov 23, 2020, 6:49 PM IST

मार्च महिन्यात देशात कोरोनाने शिरकाव केला. त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ नये म्हणून सर्वात प्रथम शाळा बंद करण्यात आल्या होत्या. अनलॉकमध्ये सर्व काही सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यास परवानगी दिली नव्हती. आजपासून काही नियम पाळून शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

Students
विद्यार्थी

सांगली - आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा प्रत्यक्ष शाळांना सुरुवात झाली आहे. सांगली जिल्ह्यातील बहुतेक शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी मुले आणि शिक्षकांमध्ये उत्साह पहायला मिळाला. कोरोनाच्या नियमांचे पालन करून वर्ग भरले होते.

50 हजार विद्यार्थी वर्गात दाखल !
सांगली जिल्ह्यात 750 शाळा आहेत. त्यापैकी बहुतांश शाळा आज सुरू झाल्या आहेत. सध्या फक्त नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. यामधील दीड लाख विद्यार्थ्यांपैकी पन्नास हजार विद्यार्थ्यांनी संमतीपत्र दिले आहेत. आणि बहुतांश विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गात दाखल झाले. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग इत्यादी गोष्टींचे सक्तीचे पालन करण्यात आले. याशिवाय शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ आणि जेवणाचा डबा आणण्याची शाळा प्रशासनाने मनाई केली आहे. दररोज केवळ चार तास शाळा भरणार आहे.

ऑनलाइनपेक्षा प्रत्यक्ष शिक्षण उत्तम -
पहिल्या दिवशी अनेक शाळांमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण मिळत होते. मात्र, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. ऑनलाइन अभ्यास समजण्यामध्येही अनेक समस्या येत होत्या. आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

6 हजार शिक्षकांची कोरोना टेस्ट -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सहा हजार शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 30 शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे असले तरी पूर्ण काळजी घेऊन आता शिक्षकसुद्धा शाळेत मुलांना शिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिक्षकांनीही मुलांना प्रत्यक्ष शिक्षण देताना आंनद होत, असल्याची भावना व्यक्त केली.

शाळेचा पहिला दिवस उत्साहाने सुरू -
सांगली शहरातील राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूलमध्ये पहिल्या दिवशी मुलींची समाधानकारक उपस्थिती राहिली. कोरोनाचे सक्तीने नियम पाळून मुलींना शिक्षण देण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.